पिंपरी : मावळ लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे अधिकृत उमेदवार श्रीरंग बारणे यांना मोठ्या मताधिक्याने विजयी करण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. शेवटच्या चार दिवसांमध्ये घरोघरी जाऊन प्रचार करून पिंपरी आणि चिंचवड विधानसभा मतदारसंघात भाजपाचे पदाधिकारी आपापल्या बुथवर “मेरा बूथ सबसे मजबूत” संकल्पना राबविणार आहेत, अशी माहिती भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांनी दिली.
हेही वाचा…“विकास कामांचा बॅकलॉग भरून काढला जाईल,” अजित पवारांनी शिरूरकरांसाठी दिली ग्वाही
मोरवाडी येथील भाजपा मध्यवर्ती कार्यालयात भाजपा शहराध्यक्ष शंकर जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली बुधवारी बैठक पार पडली. या बैठकीत प्रत्येक बूथ जिंकण्यासाठी विजयी 51 टक्के मतदान होण्याकरिता नियोजन करण्यात आले आहे. यावेळी, पश्चिम महाराष्ट्र संघटन मंत्री मकरंद देशपांडे, आमदार अश्विनी जगताप, चिंचवड विधानसभा निरीक्षक जालिंदर कामठे, जिल्हा सरचिटणीस नामदेव ढाके, मावळ लोकसभा विस्तारक भूषण जोशी, चिंचवड विधानसभा विस्तारक सागर फुगे, चिंचवड विधानसभा निवडणूक प्रमुख काळूराम बारणे, मंडल अध्यक्ष सोमनाथ भोंडवे, प्रसाद कस्पटे, संदीप नखाते आदी मान्यवर उपस्थित होते.
हेही वाचा…“पठ्ठ्या तु आमदारच कसा होतो, तेच बघतो,” शरद पवारांच्या नेत्याचा अजितदादांचं चॅलेंज
मावळ लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार यांना पिंपरी आणि चिंचवड या दोन्ही विधानसभा मतदार संघातून दीड लाखाहून अधिक मताधिक्य देवून निवडून आणण्यासाठी भाजपने बूथ स्तरावर सूक्ष्म नियोजन केले आहे. बूथनिहाय मतदार चिठ्ठ्या वाटणे, बूथ प्रतिनिधी, मतदारांसाठी वाहतूक व्यवस्था, पिण्याचे पाणी आदी व्यवस्था करण्यात येणार आहे. यासाठी मंडल अध्यक्ष, बूथ समिती तसेच पदाधिकाऱ्यांवर जबाबदारी देण्यात आली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“मोदी शहांकडून महाराष्ट्राला तोडण्याचा, लुटण्याचा प्रयत्न”
हेही वाचा..“त्यांनी फक्त वार्डाच्या निवडणुका लढल्यात अन्..,”बारणेंचं संजोग वाघेरेंना प्रत्युत्तर
हेही वाचा..“धर्माभिमानी, शिव-शंभूप्रेमी नागरिकांनी महायुतीला मतदान करा”, महेश लांडगे यांचं आवाहन
हेही वाचा…मोदींची शरद पवारांना ऑफर, शरद पवारांनी दिली मोठी प्रतिक्रिया, म्हणाले…
हेही वाचा…मुरलीधर मोहोळ vs रवींद्र धंगेकर; पुणेकरांच्या मनात नेमकं काय ?