IMPIMP
40 MLAs from Eknath Shinde and Ajit Pawar's group will soon go home 40 MLAs from Eknath Shinde and Ajit Pawar's group will soon go home

राज्यात आघाडीचंं वारं वाहू लागलं..! एकनाथ शिंदे अन् अजित पवार गटातील ४० आमदारांची लवकरच घरवापरी

मुंबई : काल रविवारी नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. मोदींसह एकूण ७२ मंत्र्यांना राष्ट्रपती द्रौपद्री मुर्मू यांनी गोपनियतेची शपथ दिली. यात महाराष्ट्रातील सहा खासदारांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र यामध्ये अजित पवार गटाला मोदींच्या मंत्रीमंडळात स्थान मिळालं नाही. याच पार्श्वभूमीवर आता राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी महायुतीला डिवचण्याचा प्रयत्न केलाय.

हेही वाचा..पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, आज मंत्रीपदाची शपथ घेणार ? 

विजय वडेट्टीवार म्हणाले की, लोकसभा निवडणुकीनंतर महाराष्ट्रातील राजकारणात जोरार वारं वाहत आहे. हे वारं महाविकास आघाडीच्या बाजूनं आहे. गद्दारीचा शिक्का लागलेली मंडळीची पार्टी संपली आहे. गद्दारी करून बाहेर पडलेले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या ४० आमदारांची लवकरच घरवापसी होईल. असा दावा देखील त्यांनी केलाय.

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त 

केंद्रात भाजपचे सरकार आले नसते तर अजित पवार महायुतीतून बाहेर पडले असते. त्यांच्या सर्व प्रकारच्या चौकशा बंद झाल्या आहेत. प्रफुल्ल पटेल यांची ईडी चौकशीही बंद झाली आहे. छगन भुजबळांचेही तसेच झाले, ही नवी आयडीया आहे, सरकार किती दिवस टिकेल हे लवकरच समजेल, असा इशारा देखील त्यांनी दिलाय.

पुढे बोलतांना वडेट्टीवार म्हणाले की, जे मिळेल, ते खावे, राज्यमंत्रीपद मिळाले तर ठिक नाही तर तेही मिळणार नाही, अशी अजितदादांची अवस्था आहे, भाजप म्हणजे वापरा आणि फेका, हे उद्धव ठाकरे यांना आधीच समजले म्हणून ते सावध झाले. असा टोलाही त्यांनी लगावला.

READ ALSO :

हेही वाचा…राज्यातील ‘या’ सहा खासदारांनी घेतली मंत्रीपदाची शपथ, मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान 

हेही वाचा…“आम्ही देखील त्यांच्या शब्दावर राहू, थोडा धीर ठेवू”, कॅबिनेट मंत्री न मिळाल्यानंतर पटेलांचं विधान 

हेही वाचा…Chandrakant Patil Video | वृक्ष लागवडीत चंद्रकांत दादांनी रचला नवा इतिहास, यंदा एकच लक्ष्य, लावू ६५ हजार वृक्ष 

हेही वाचा..“एक सामान्य कार्यकर्ता ते थेट कॅबिनेट मंत्रीपद”, कसा आहे मोहोळांचा राजकीय प्रवास ? 

हेही वाचा…“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं