IMPIMP
6 hours to get blood sample, then ate pizza, replace Amitesh Kumar 6 hours to get blood sample, then ate pizza, replace Amitesh Kumar

“रक्ताचा नमुना घेण्यासाठी ६ तास, नंतर पिझ्झा खाऊ घातला, अमितेश कुमार यांची बदली करा”

पुणे : पोर्श कार अपघात प्रकरणात आता सर्वात मोठी घडामोड समोर आली आहे. पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची थेट बदली करण्याची मागणी करण्यात आली आहे. यासंदर्भात माजी आयएएस अधिकारी अरूण भाटिया यांनी महाराष्ट्र मानवाधिकार आयोगाच्या अध्यक्षांना पत्र पाठवून करण्यात आली आहे. त्यामुळे या प्रकरणाला आता वेगळेच वळण लागल्याचे दिसून येत आहे.

हेही वाचा…“०४ जून च्या नंतर अजित दादांची नौका बुडणार”, शरद पवार गटाचा खोचक टोला 

अरूण भाटिया यांनी मानवाधिकार आयोगाला पाठवलेल्या पत्रात असं म्हटलंय की, मी या प्रकरणात तुमचा हस्तक्षेप मागतो आहे. कारण या प्रकरणाने आम्हाला हादरवून टाकले आहे आणि आमची असुरक्षितता वाढविली आहे. आम्हाला आमच्या प्रशासनाचा आणि लोकशाहीचा भयानक चेहरा दाखलवा आहे. भ्रष्ट अधिकारी आणि त्रस्त नागरिक आता दैनंदिन जीवनाचा भाग बनले आहेत. भाटिया यांनी हे पत्र पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि लोकायुक्त,मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाला पाठवले आहे.

हेही वाचा..“भुजबळांनी आव्हाडांना खडेबोल सुनावले पाहिजे होते”, अजित पवार गटाच्या दोन्ही नेत्यांमध्ये जुंपली

पुढे त्यांनी असं म्हटलंय की, पुण्यातील सर्वात मोठ्या सरकारी रूग्णालयाच्या मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांसह पोलिस अधिकारी आणि वरिष्ठ डॉक्टरांनी संगनमत करून एका गुन्हेगाराला वाचवले. आरोपीने मद्दपान केले की नाही हे तपाण्यासाठी रक्ताचे नमुने पाठविण्यास पोलिसांना सहा तासांहून अधिक वेळ लागला. इतकंच नाही तर रक्त तपासणीपूर्वी पोलिसांनी त्याला पोलिस स्टेशनमध्ये पिझ्झा खायला दिला. मग डॉक्टरांनी सॅम्पल नष्ट केला.

पोलिस आयुक्त हे शहरातील पोलिस दलाचे प्रतिनिधित्व करत असल्याने निष्पक्ष चौकशीसाठी त्यांची तातडीने पुण्याबाहेर बदली करून त्यांच्या वर्तनाची चौकशी करण्यात यावी. अशी मागणी देखील त्यांनी केलीय. तर एकापाठोपाठ एक धक्कादायक खुलासे झाल्याने राज्याने राजकारण तापले आहे. १९ मे च्या रात्री भीषण अपघातात दोन अभियंत्यांचा मृत्यू झाल्यानंतर आरोपी अल्पवयीन मुलाल वाचविण्या त पोलिसांसह डॉक्टरांचे कारनामे बाहेर आले आहेत. त्यामुळे थेट आयुक्तांची बदली व्हावी अशी मागणीही केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..“तुम्ही नेमकं देसाई आहात की कसाई”? रवींद्र धंगेकरांचा शंभुराजेंना सवाल 

हेही वाचा…कॉंग्रेसचे संदीप गुळवे ठाकरे गटात, नाशकातील विधान परिषद निवडणुकीचं चित्र बदलणार 

हेही वाचा…०४ जूननंतर अजितदादा गटात बंड, सुनील तटकरे आमदारांना घेऊन डायरेक्ट भाजपमध्ये जाणार ? 

हेही वाचा..अपघात झाल्यानंतर सुनील टिंगरे पोलिस स्टेशनमध्ये का गेले ? अजित पवार म्हणाले… 

हेही वाचा…शेलारांची राज ठाकरेंसोबत चर्चा, अभिजित पानसे उमेदवारी मागे घेणार का ? दिलं हे उत्तर