IMPIMP
Dilip Satpute Dilip Satpute

शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं

नगर : आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाने पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. लोकसभा निवडणुकीत झालेल्या पराभवामुळे शिंदे गटाने आता पक्षात बदल करण्यास सुरूवात केलीय. अशातच नगर शहर शिवसेनाप्रमुख दिलीप सातपुते यांना पदावरून हटविण्यात आले आहे. त्यांच्या जागी आता नगर शहराच्या प्रमुखपदी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आलीय.

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

शिवसेना पक्ष फुटीनंतर अनेक आमदारांनी उद्धव ठाकरे यांची सोडली. त्यात नगर शहरात शिवसेना शिंदे गटाने दिलीप सातपुते यांची नगर शहराप्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली. त्यातच आता नगर जिल्ह्यात पक्ष संघटना मजबुत करण्यासाठी आणि स्थानिक नेत्यांना बांधून ठेवण्यासाठी शहर संघटनेत खांदेपालट करण्यात आली आहे.

हेही वाचा…“जितेंद्र आव्हाडांना अजितदादा नावाचा हळद्या रोग झालाय” 

दरम्यान, संपुर्क प्रमुखपदाची धुरा सांभाळणारे सचिन जाधव यांच्यावर नगर शहरप्रमुख म्हणून जबाबदारी सोपवण्यात आलीय. एक वर्षासाठी सचिन जाधव यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शहरात संघटना बांधणीसाठी प्रयत्न करणार आहे. तसेच नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने नगरची जागा शिवसेनेला मिळावी, यासाठी पक्षाकडे आग्रर धरणार असल्याचे म्हटले आहे.

READ ALSO :

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

Leave a Reply