IMPIMP
A case has been filed against Congress candidate Ravindra Dhangekar in Pune A case has been filed against Congress candidate Ravindra Dhangekar in Pune

पुण्यात कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकरांच्या विरोधात गुन्हा दाखल, प्रकरण काय ?

पुणे : मतदानाच्या आदल्या दिवशी गोंधळ घातल्याप्रकरणी महाविकास आघाडीचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यावर आता पोलिसांनी मोठं पाऊल उचललं आहे. सहकार पोलीस स्टेशनच्या बाहेर गोंधळ घातल्याप्रकरणी आता पोलिस स्टेशनमध्ये रवींद्र धंगेकर यांच्यासह ३० ते ३५ कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे पुण्यात सध्या राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.

हेही वाचा..निवडणुकीनंतरही युगेंद्र पवार राजकारणात सक्रीय,अजितदादांच्या विरोधात विधानसभेची तयारी ? 

मतदानाच्या एक दिवस आधी भाजपकडून पैसे वाटप वाटल्याचा आरोप रवींद्र धंगेकर यांनी केला होता. त्यानंतर संबंधित व्यक्तींच्या विरोधात कारवाई करण्यात यावी, अशी मागणी धंगेकरांनी केली होती. मात्र त्यावर कोणताही प्रतिसाद न आल्याने सहकार पोलीस स्टेशनच्या बाहेरच ठिय्या आंदोनल केलं होतं. त्यावर परिस्थितीचं गांभीर्य ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी अतिरिक्त पोलीस कुमक बोलवली होती.

हेही वाचा…मुख्यमंत्र्यांचा नाशकात ८०० कोटींचा घोटाळा, चौकशी करण्याची राऊतांची फडणवीसांकडे मागणी 

त्यानंतर मध्यरात्रीपर्यंत हा गोंधळ तसाच सुरू होता. तर पोलीस स्टेशनच्य बाहेर मतदानाच्या आधी असा गोंधळ सुरू झाल्याने एकप्रकारे तणावाचं वातावरण निर्माण झालं होतं. त्यामुळे पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी देखील परिस्थितीची गंभीर दखल घेऊन कायदा व सुव्यवस्था बिघडवणाऱ्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्याचा इशारा देण्यात आला होता. त्यानंतर आता रवींद्र धंगेकर यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.

READ ALSO :

हेही वाचा..“मुख्यमंत्र्यांकडून अपघाताची जबाबदारी झटकण्याचा पळकुटेपणा आम्हाला मान्य नाही”, वर्षा गायकवाडांचा हल्लाबोल

हेही वाचा…“अरविंद सावंताचा मोठा करिश्मा, विरोधात उमेदवार हुडकायला ..,” जयंत पाटलांची जोरदार टोलेबाजी 

हेही वाचा..पिंपरी-चिंचवडमध्ये लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस ‘निष्प्रभ’, वाचा नेमकं काय घडलं ? 

हेही वाचा…प्रफुल्ल पटेलांना मोदींना घातला ‘जिरटोप’, शरद पवार गटाची जहरी टिका, म्हणाले.. “त्या बीभत्स माणसाच्या..”

हेही वाचा….भाजपच्या आमदारांनी ठाकरेंना घेरलं, भुजबळांनी ठाकरेंची बाजू घेत चांगलचं सुनावलं