IMPIMP
A crushing defeat of Narendra Modi who considers himself an avatar of God A crushing defeat of Narendra Modi who considers himself an avatar of God

“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव”

मुंबई : लोकसभा निवडणुकीत भाजपप्रणित एनडीए आघाडीला मोठा फटका बसला आहे. तर विरोधात असलेली इंडिया आघाडी सध्या मजबुत स्थितीमध्ये आली आहे. यातच आता दोन्ही बाजूंनी सत्ता स्थापन करण्याच्या हेतूने दिल्लीत बैठकांचा सपाटा लावला आहे. त्यानंतर ०९ जून रोजी पंतप्रधान पदाचा शपथविधी होण्याची शक्यता आहे. यातच आता कालच्या निकालानंतर सामानातून भाजपवर हल्लाबोल करण्यात आलाय.

हेही वाचा…लोकसभेच्या निवडणुकीत आघाडीला सर्वात जास्त जागा, अजित पवार गटाला भोपळा ? एक्झिट पोल समोर 

स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदी या व्यक्तीचा दारूण पराभव भारतीय जनतेने केला आहे. हा लोकशाहीने हुकूमशाही, झुंडशाहीवर विजय मिळवला आहे, असंच म्हणावं लागेल. नरेंद्र मोदींचा चारशेपारचा नारा सुकलेल्या पाचोळ्यासारखा उडून गेला. लोक सार्वभौम आहेत. लोकशाहीचे संरक्षणकर्ते लोकच असतात हे भारताने दाखवून दिलं आहे. चारशे पार जागा निवडून द्या. नव्हे चारशे जागा निवडून आणणारच या अहंकाराला भारतीय जनतेने पायदळी तुडवलं आहे. खुद्द वाराणसीत मोदी सुरूवातीच्या टप्प्यात पिछाडीवर पडले. तेव्हा देव जागा आहे हे दिसून आले. असा टोलाही त्यांनी लगावला.

हेही वाचा..पंकजा मुंडे की बजरंग सोनवणे ? बीडमध्ये कोण मारणार बाजी ? एक्झिट पोल आलं समोर 

नरेंद्र मोदी आणि अमित शाह या जोडगोळीने भारत देशाचा तुरुंग केला. जनतेलाही मोकळेपणाने बोलण्याचं किंवा वावरण्याचं स्वातंत्र्य नव्हतं. विरोधात बोलणाऱ्यांना सरळ तुरुंगात टाकलं गेलं. दिल्ली, झारखंडच्या बहुमतातील मुख्यमंत्र्यांना सरळ तुरुंगात टाकणाऱ्या मोदी शाह यांनी भारतीय जनता पक्षाचं वॉशिंग मशीन केलं. देशातल्या सर्व पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना भाजपात आणून आयेगा तो मोदीही हा नारा देणाऱ्यांना जनतेने जागा दाखवली. लोकसभा निवडणुकीचे निकाल हाच जनादेश आहे. या जनादेशाचा आदर मोदी करणार आहेत काय? असा सवालही त्यांनी केलाय.

तर भाजपाला बहुमत मिळालेले नाही हे पहिले सत्य व कथित एनडीएच्या बहुमताचा आकडा काठावर आहे. चारशे पारच्या रथावर स्वार होऊ पाहणाऱ्या मोदींना रिक्षात बसून रायसिना हिल्सवर फिरावं लागेल. देशाचं चित्र स्पष्ट झालं आहे. ज्या उत्तर प्रदेशात राम मंदिराचं राजकारण करुन मोदी स्वतःला हिंदूंचे नवे शंकराचार्य म्हणून प्रस्थापित करु पाहात होते त्या उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टी आणि काँग्रेसने मोठी आघाडी घेतली. अमेठीत स्मृती इराणींचा पराभव राहुल गांधींच्या सामान्य कार्यकर्त्याने केला. रायबरेलीत राहुल गांधी विजयी झाले. मोदींच्या अहंकाराचा गाडा रोखण्याचं काम उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्राने केलं. अशी टिकाही त्यांनी केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..कॉंग्रेसला मिळाल्या सर्वाधिक १३ जागा, नागपुरात लागले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर 

हेही वाचा..तर नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत

हेही वाचा..“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण 

हेही वाचा…“मी भक्त म्हणून खूप कमी पडलो”, मोदींसाठी प्रवीण अलई यांची भावनिक पोस्ट 

हेही वाचा…बारामतीत सुनेत्रा पवारांना मोठा धक्का, सुप्रिया सुळे पुन्हा होणार खासदार