IMPIMP
A humble suggestion to BJP's potential allies, if not get Speaker of Lok Sabha first A humble suggestion to BJP's potential allies, if not get Speaker of Lok Sabha first

“भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : आधी लोकसभेचं सभापतीपद मिळवा, नाही तर…

मुंबई : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची आज एनडीएच्या नेतेपदी एकमताने निवड करण्यात आली. त्यानंतर येत्या ९ जून रोजी नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधान पदाची शपथ घेणार आहे. मागच्या निवडणुकीपेक्षा यावेळी भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं नाही. त्यामुळे त्यांना मित्र पक्षांची मदत घ्यावी लागणार आहे. त्यावर आता ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी टोला लगावला आहे.

हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले.. 

आदित्य ठाकरे यांनी एनडीएच्या नेत्यांना काही सल्ला दिला आहे. ते म्हणाले की, नव्यानेच ‘एनडीए’ ची पुन्हा जाणीव झालेल्या भाजपच्या संभाव्य मित्रपक्षांना एक नम्र सूचना : सगळ्यात आधी लोकसभेचं सभापती पद मिळवा. भाजपच्या कपटाच्या अनुभवातून सांगतोय, ते ज्या क्षणी तुमच्यासोबत सरकार बनवतील, त्या क्षणी आश्वासनं मोडायचा आणि तुमचे पक्ष फोडायचा प्रयत्न सुरु करतील. ह्याचा अनुभव तुम्हीही आधी घेतला आहेच. असंही ठाकरेंनी म्हटलंय.

हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

दरम्यान, मागच्या २०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला स्पष्ट बहुमत मिळालं. मात्र भाजपला यंदाच्या निवडणुकीत स्पष्ट बहुमत मिळवता आलं नाही. यातच आता भाजपला मित्र पक्षांची मदत घ्यावी लागत आहे. त्यातच आज एनडीएची महत्वाची बैठक पार पडली. यात नरेंद्र मोदी यांची एनडीएच नेतेपदी निवड करण्यात आली. त्याआधी काही एनडीएच्या नेत्यांनी भाजपकडे काही अटी घातल्या आहेत.

READ ALSO :

हेही वाचा…लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

हेही वाचा…“देशात एनडीएचं सरकार चालवतांना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येईल” 

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात पुन्हा राजकीय बंड, शिंदे गटाचे ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात ? 

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात पुन्हा राजकीय बंड, शिंदे गटाचे ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात ? 

हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर