मुंबई : राष्ट्रवादी पक्षनाव आणि चिन्हांबाबत निवडणुक आयोगात सुनावणी सुरू आहे. सध्या अजित पवार गटाकडून वकिल मनिंदर सिंग आणि नीरज किशन कौल युक्तिवाद करीत आहेत. मागील झालेल्या सुनावणीत अजित पवार गटाकडून युक्तिवाद करण्यात आला होता. त्यानंतर अजित पवार गटाकडूनही युक्तिवाद करण्यात आला होता. यातच आजच्या सुनावणीत अजित पवार गटाकडून युक्तिवाद सुरू असून शरद पवार गट यावर आक्षेप घेणार का ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचा बिगूल वाजला, केंद्रीय निवडणुक आयोगाने जाहिर केला कार्यक्रम
विधीमंडळातील बहुमत आमच्याकडील बघून ते बघून निर्णय घेण्यात यावा, पक्षात फुट पडल्यानंतर पक्ष कोण हा प्रश्न उपस्तित होतो, त्यामुळे आमचे बहुमत विचारात घ्या. अंदाजे दीड लाखाहून अधिक शपथपत्र आमच्याकडे असून आमदार, खासदार प्रतिनिधींनी प्रतिज्ञापत्र आमच्याकडे दिले. अजित पवारांची निवड कायद्याला धरून आणि योग्य पद्धतीने करण्यात आली आहे. असा युक्तिवाद अजित पवार गटाकडून करण्यात आला आहे.
हेही वाचा…शरद पवार गटाला कोर्टाचा धक्का, ‘ती’ याचिका फेटाळली
दरम्यान, निवडणुक आयोगात अजित पवार गटाने शिवसेना पक्ष फुटीचा दाखला देण्यात आला आहे. यातच पक्षावर कोणतीही एक व्यक्ती वर्चस्व गाजवू शकत नाही. असा युक्तिवाद नीरज किशन कौल यांनी केला आहे. शरद पवारांनी घर चालवावं तशा पद्धतीने पक्ष चालवला. शरद पवारांनी सर्व नियम पायदळी तुटवल. पक्षात यापूर्वी संघटनात्मक कारवाई झाल्या नाहीत. त्यासोबत पक्षांतर्गत लोकशाही उरली नाही. असा दावा देखील कौल यांनी अजित पवार गटाच्या वतीने केला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…शरद पवारांची मोठी खेळी, अजित पवारांचा एकेकाळचा कट्टर समर्थक शरद पवार गटात दाखल ?
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
हेही वाचा…शिंदे गटाचा होणार भ्रमनिरास..! अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात लागणार मंत्रीपदाची पुन्हा लॉटरी
हेही वाचा…शरद पवारांना कोर्टाचा मोठा दिलासा..! शरद पवारांनी कोर्टातला ‘हा’ निकाल जिंकला
हेही वाचा…मोठी बातमी..! मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी आणलेल्या जेसीबीला अपघात, तीन ते चार जण जखमी