मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे आज एक दिवसीय दौऱ्यासाठी पुण्यात दाखल झाले आहेत. मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोरोना संदर्भात आढावा बैठक संपन्न झाली.
उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, भाजप खासदार गिरीश बापट, शिवसेना खासदार श्रीरंग बारणे, राष्ट्रवादीचे खासदार अमोल कोल्हे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यासारखे लोकप्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते.
पुणे शहर आणि पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाच्या संसर्गासंदर्भात सुरु असलेल्या उपाययोजनांचा आढावा त्यांनी बैठकीत घेतला. मुख्यमंत्री आता सर्किट हाऊसला रवाना झाले आहेत.
दरम्यान, पुणे शहर आणि जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. मुख्यमंत्री ससून किंवा नायडू यासारख्या एखाद्या रुग्णालयाला भेट देण्याची शक्यताही वर्तवली जात आहे. स्मार्ट सिटी वॉररुममध्येही ते पाहणी करु शकतात. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पुणे दौरा संपवून संध्याकाळी पाच वाजता मुंबईकडे येण्यास निघतील.