IMPIMP

पुण्यातील कॉंग्रेस भवन परिसरामध्ये तणावपुर्ण परिस्थिती, पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात

पुणे : पुण्यातील भाजपच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेस भवन परिसरात मोठा पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या ठिकाणी तणावपुर्ण परिस्थिती निर्माण झाली आहे. कॉंग्रेस शहाराध्यक्षांच्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. भाजपचे धीरज घाटे यांच्या जीविताविषयी कॉंग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे यांच्याकडून वादग्रस्त  करण्यात आले आहे. यामुळे भाजपच्या कार्यकर्त्यांकडून तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. कॉंग्रेसचे कार्यकर्ते देखील कॉंग्रेस भवनामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित आहेत.

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

दुसऱ्या बाजूला इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद पुण्यात देखील बघायला मिळाले. पुणे भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांनी राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ बॅनरबाजी केली. तर आंदोलनाचा इशारा देखील देण्यात आला होता. याच पार्श्वभूमीवर पुण्यातील कॉंग्रेसभवनासमोर पोलिसांचा मोठा बंदोबस्त वाढवण्यात आला होता.

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

दरम्यान, भाजपच्या धीरज घाटे यांच्याकडून राहुल गांधी यांच्याविषयी पोस्टरबाजी करण्यात आली होती. त्यानंतर कॉंग्रेसचे शहाराध्यक्ष अरविंद शिंदे यांनी धीरज घाटे यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केले होते.

READ ALSO :

 

हेही वाचा…“मिलिंद नार्वेकरांमुळे कॉंग्रेसचा उमेदवार पडणार”?शिंदे गटातील आमदाराचा मोठा दावा 

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान 

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

Leave a Reply