IMPIMP

आप’ली वारी, आपल्या दारी चा नारा देत मयुर दौंडकर खेड आळंदी विधानसभेतल्या समस्या जाणून घेणार

राजगुरूनगर : ज्ञानोबा – तुकोबांच्या पालखीचे पंढरपूरकडे प्रस्थान झाल्यावर आम आदमी पक्षाचे युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर हे 1 जुलैपासून खेड आळंदी विधानसभेची वारी सुरू करत आहेत.त्यांच्या या वारीची सुरुवात बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या भीमाशंकर पासून होणार आहे.

खेड – आळंदी विधानसभा मतदारसंघातील समस्या, युवकांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी या वारीचे आयोजन करण्यात आल्याची माहिती, युवक प्रदेशाध्यक्ष मयुर दौंडकर यांनी दिली.

१ जुलै रोजी सकाळी ७ वाजता भीमाशंकरचे दर्शन घेऊन या वारीची सुरवात होईल. त्यानंतर कारकुडी, टोकावडे, भोरगिरी, भिवेगाव, शिरगाव, भोमाले, पाभे, मोरोशी, धुवोली, वांजाळे, मंदोशी, नायफड, डेहेणे या गावातून ही वारी जाईल.

ग्रामस्थांची संवाद साधत समस्या जाणून घेत त्यांची सोडवणूक करण्यासाठी उपाययोजना करणे, यावर या वारीत भर दिला जाणार असल्याचे दौंडकर म्हणाले.

Leave a Reply