IMPIMP
Ab ki baar charso par this slogan is about Modi's embrace, power at the centre Ab ki baar charso par this slogan is about Modi's embrace, power at the centre

“अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट, केंद्रात सत्ताबद्दल”, पृथ्वीराज चव्हाणांचा दावा

मुंबई : लोकसभेची निवडणूक ही लोकांनीच हाती घेतली असून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या घोषणा त्यांच्याच अंगलट आल्या आहेत. एकूणच भाजपला सध्या बहुमताचा २७२ चा आखडाही गाठणे कठीण जाईल अन् केंद्रात सत्ताबदलाची शक्यता स्पष्टपणे दिसत आहे. असा दावा माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. त्याचबरोबर राज्यात महाविकास आघाडीला ३२ ते ३५ जागा मिळण्याची शक्यता देखील त्यांनी व्यक्त केलीय.

हेही वाचा..“पुण्यात उमेदवारालाच लोकसभेसाठी स्वत:ला मतदान करता आले नाही”, कारण आले समोर 

लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने पृथ्वीराज चव्हाण यांनी महत्वाचे भाष्य केलं. यातच राज्यातील ३२ ते ३५ जागा महाविकास आघाडीच्या निवडून येतील. अजित पवार गटाची एकही जागा निवडून येणार नाही. तर शिंदेंच्या तीन ते चार जागा निवडून येऊ शकतात. यातच कॉंग्रेसचे १२ उमेदवार निवडून येण्याचा अंदाज चव्हाणांनी व्यक्त केलाय.

हेही वाचा..पुणे लोकसभा मतदारसंघात ३ वाजेपर्यंत किती मतदान ? पर्वतीमध्ये सर्वात जास्त मतदान 

2019 च्या लोकसभा निवडणुकीच्या तुलनेत त्यांच्या जागा वाढतील असे एकही राज्य दिसत नाही. या वेळी भाजपला २७२ जागाही मिळणार नाहीत. अब की बार चारसो पार ही घोषणा मोदींच्या अंगलट आली आहे. त्यांनी स्वत: चे व्यक्तिस्तोम माजविले आहे. २०७४ पर्यंत विकसित भारताची संकल्पना मांडताहेत. मात्र त्याची स्पष्टता नाही, मंदिराचा मुद्दा चालला नाही. त्यामुळे त्यांनी आता द्वेषाचे व धार्मिक धुव्रीकरणाचे राजकारण सुरू केले आहे. अशी टिका देखील चव्हाण यांनी म्हटलंय.

READ ALSO :

हेही वाचा..पुण्यात 5 वाजेपर्यंत ४४.९० टक्के मतदान, सर्वात जास्त ‘कसबा पेठेत’ मतदान 

हेही वाचा…“अंडे न देणाऱ्या खुडूक कोंबडीला कोण स्वीकारणार ?” सदाशिव लोखंडेंची वाकचौरेंवर बोचरी टिका 

हेही वाचा..“आजची मोदींची पावलं ही हुकूमशाहीकडे जाताहेत”, शरद पवारांचा मोदींवर हल्लाबोल 

हेही वाचा…“आपण कुठल्याही आफवांवर विश्वास ठेऊ नये”, ‘त्या’ विधानावर दिलीप वळसे पाटलांचं स्पष्टीकरण 

हेही वाचा…“नगरमध्ये ‘प्रसाद’ आणि ‘मालक’मंत्री”, विखे अन् रोहित पवारांमध्ये रंगल ट्विटवॉर