मुंबई : सध्या महाराष्ट्रात विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या जागांसाठीची मोठी चुरस आपल्याला पाहायला मिळत आहे. महाविकास आघाडीतील शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीनही पक्षांनी प्रत्येकी ४ जागा वाटून घेतल्या आहेत. तथापि याबाबतची नाव मंत्रिमंडळ बैठकीतच निश्चित झाली असली तरी अजून या तीनही पक्षांनी या नावांबाबत कमालीची गुप्तता पाळली आहे.
महाराष्ट्र काँग्रेसकडून अभिनेत्री आणि काँग्रेस नेत्या उर्मिला मातोंडकरांना संधी मिळणार अशी चर्चा सुरु असताना आता त्यांचं नाव शिवसेनेकडून घेतल जात आहे. कारण काँग्रेसचा हा उमेदवार आता शिवसेनेचा आमदार बनणार आहे. त्यासंबंधीची ऑफर शिवसेनेकडून मातोंडकरांना देण्यात आली होती. त्यांनी ती स्वीकारली असल्याची खात्रीलायक माहिती विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे.
मागील काही दिवसांपासून महाराष्ट्र सरकार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे विरुद्ध राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यात मोठ्या प्रमाणात मतभेद चव्हाट्यावर आले होते, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांना पत्र लिहून जोरदार चिमटे काढले होते. आता महाराष्ट्र सरकार पाठवत असलेल्या १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी स्वीकारणार का? याकडे सर्वांचे लक्ष आहे.
Read Also :
मागासवर्गीय अधिकाऱ्यांना प्रमोशन मिळू नये म्हणून काही श्रीमंत मराठे प्रयत्नशील: प्रकाश आंबेडकर https://t.co/tOnmvGigtk @Prksh_Ambedkar @VBAforIndia
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 30, 2020