IMPIMP

कृष्णकुंज बाहेर तुफान गर्दी ! मंत्री आदित्य ठाकरे यांच्या समर्थकांचा मनसेत होणार प्रवेश

 

मुंबई : वरळीतील सामाजिक संस्था, सार्वजनिक मंडळाचे कार्यकर्ते यांनी मनसेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. राज ठाकरेंच्या उपस्थितीत हे लोक मनसेचा झेंडा हाती घेणार आहेत. वरळीतील लोकांनी आदित्य ठाकरेंना निवडून दिलं होतं. परंतु काही महिन्यात येथील नागरिकांना त्यांच्या कामाची प्रचिती आली, अनेकांनी राज ठाकरेंच्या नेतृत्वात काम करण्याची इच्छा व्यक्त केली. त्यामुळे कृष्णकुंज निवासस्थानी या नागरिकांचा मनसेत प्रवेश होणार असल्याचं संतोष धुरींनी सांगितले.

राज्याचे पर्यावरण मंत्री आणि वरळी मतदारसंघाचे आमदार आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघातील नागरिकांनी शुक्रवारी सकाळी कृष्णकुंज बाहेर गर्दी केली. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत हे लोक मनसेत प्रवेश करणार असल्याची माहिती मनसेचे विभाग अध्यक्ष संतोष धुरी यांनी दिली. मागील विधानसभेत राज ठाकरे यांच्या मनसेने आदित्य ठाकरे यांच्याविरोधात मनसेचा उमेदवार दिला नव्हता.

गेल्या अनेक दिवसांपासून नवी मुंबई, औरंगाबाद, ठाणे याठिकाणी इतर पक्षातून मनसेत प्रवेश करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. औरंगाबाद येथे माजी खासदार चंद्रकांत खैरे समर्थक सुहास दशरथे, नेते प्रकाश महाजन आणि माजी आमदार हर्षवर्धन जाधव यांनी मनसेत प्रवेश केला होता. त्यानंतर सुहास दशरथे यांच्या नेतृत्वात अनेक शिवसैनिकांनी गेल्या आठवड्यात राज ठाकरेंच्या हस्ते मनसेत प्रवेश केला आहे.

Read Also