सुमारे ४०० वर्षे पुरातन वटवृक्ष हे भोसे (जि. सांगली) येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कामात अडसर येत होते . हे पाहता राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांना पत्र लिहून विनंती केली होती. या पत्रास मान ठेवून महामार्गाचा नकाशा बदलण्यात आला असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली.
A 400 year old banyan tree in Sangli a District and a Tiger corridor saved yesterday. Feels good. 2 interventions where I had humbly requested 2 Union Ministers and received a positive response from both to assist saving the environment. (1/2) https://t.co/gs5BJrki99
— Aaditya Thackeray (@AUThackeray) July 24, 2020
हा वटवृक्ष त्या परिसरातील एक ऐतिहासिक ठेवा तर आहेच, त्याचबरोबर ते वटवाघळे आणि इतर दुर्मिळ पक्षी यांच्याकरीता नैसर्गिक निवासस्थान देखील आहे. त्यामुळे संबंधीत जागेवरील महामार्गाचे संरेखन काही प्रमाणात बदलून वटवृक्षाचे जतन होण्याबाबत कार्यवाही करण्याची विनंती आदित्य ठाकरे यांनी गडकरींना पत्राद्वारे केली होती. त्याची मागणी आता मान्य करण्यात आली असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.