कोरोनानंतर आता चीनमध्ये प्लेगची साथ आल्याची माहिती समोर आली आहे. आतापर्यन्त प्लेगने दोघांचा बळी घेतल्याचेही सांगण्यात येत आहे. ब्यूबोनोयर शहरातील आरोग्य यंत्रणेने याबाबतची माहिती दिली आहे. या प्लेगमुळे शरीरातील अवयव निकामी होत रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य यंत्रणेने दिली आहे.
मृत रुग्ण राहत असलेला परिसर सील करण्यात आला असून मृत रुग्णांच्या संपर्कात आलेल्यांमध्ये अद्याप प्लेगचे कोणतेही लक्षण आढळले नसल्याचे आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितल. प्लेग पसरत असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर सरकारने तातडीने पावले उचलत प्लेगच्या फैलावाला पायबंद घातल्याचा दावा चीनकडून करण्यात येत आहे. मात्र, अद्यापही काही रुग्णांमध्ये प्लेगची लक्षणे आढळत आहेत. तसेच आता आठवड्याभरात प्लेगमुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाल्याने प्लेगचा फैलाव वाढत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. चीनमध्ये प्लेगचा अखेरचा उद्रेक 2009 मध्ये झाला होता. त्यावेळी तिबेटच्या पठाराजवळील निकेतन शहरात हजारो लोकांचा प्लेगने बळी घेतला होता.
चीनच्या उत्तर भागासह इतर ठिकाणीही काही रुग्णांमध्ये प्लेगची लक्षणे आढळली आहेत. बाओटो शहरात गुरुवारी एका रुग्णांचा मृत्यू अनाकलनीय आजारामुळे झाल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्याल प्लेग असण्याची शक्यता व्रतवण्यात येत आहे. तसेच जुलै महिन्यात पश्चिम मंगोलियात एका 15 वर्षांच्या मुलाचा ब्युबोनिक प्लेगमुळे मृत्यू झाला होता. मरमॅट जनावराचे मांस खाल्ल्याने त्याला प्लेगची लागण झाल्याची शक्यता चीनच्या आरोग्य विभागाने वर्तवली आहे.