मुंबई : लोकसभा निवडणुकीचा प्रचार सध्या राज्यात जोरदार सुरू झाला आहे. अशातच आता शिवसेना ठाकरे गटाकडून लोकसभा निवडणुक प्रचाराच्या अनुषंगाने सरकारच्या कारभारावर टिका करणाऱ्या जाहिराती तया केल्या आहेत. एका जाहिरातीमध्ये सरकारला महिला अत्याचारावर प्रश्न उपस्थित केले आहे. या जाहिरातीवर भाजपने आक्षेप घेतला असून ठाकरे गटाला पॉप, पार्टी आणि पॉर्न संस्कृती रूजवायची आहे का असा सवाल भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांनी केला आहे. त्यावर आता ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी पलटवार केला आहे.
हेही वाचा..‘अनंत गीते हिरवा साप, विद्वेष अन् वेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न “, तटकरेंचा घणाघात
शिवसेना उबाठा गटाने महिला अत्याचाराच्या संबंधी एक जाहिरात प्रसिद्ध केली आहे. या जाहिरातीमध्ये कलाकार हा पॉर्न स्टार आहे. उल्लू अॅपमधील वेबसीरीजमध्ये त्याने काम केले असून त्यात महिलांचे शोषण करतो. अशा कलाकाराल घेऊन त्यांनी महिला अत्याचारावर जाहिरात कशी केली असा सवाल चित्रा वाघ यांनी केलाय. त्यावर आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण ३००० हून जास्त सेक्स व्हिडीओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे HD व्हिडीओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या. असे म्हणत सुषमा अंधारे यांनी चित्रा वाघ यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. तसेच त्यांची काही चूक नाही. सध्या त्या दिल्या भाकरीच्या आणि सांगितल्या चाकरीच्या आहेत. अस म्हणतही अंधारेंनी वाघ यांना डिवचलं.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधकांनी आता जाहिरातींच्या माध्यमातून सत्ताधारी पक्षांवर टिका करण्यास सुरूवात केली आहे. यातच ठाकरे गटाने प्रकाशित केलेल्या जाहिरातीवर चित्रा वाघ यांनी आक्षेप घेतला. त्यांनी भर पत्रकार परिषदेत त्या जाहिरातीचे फोटो दाखवले. त्यानंतर आता चित्रा वाघ यांच्याविरोधात ठाकरे गटातील महिला आक्रमक झाल्या आहेत.
आक्रस्ताळ्याबाई सवयीप्रमाणे बडबडून गेल्या. पण 3000 हून जास्त सेक्स व्हिडिओ व्हायरल झालेल्या प्रज्वल रेवना, किंवा मुलुंडचे HDव्हिडिओ वाल्याबद्दल त्या अळीमिळी चुपचीळी करून बसल्या.
त्यांची काही चूक नाही, सध्या त्या दिल्या भाकरीच्या & सांगितल्या चाकरीच्या आहेत.@ShivSenaUBT_— SushmaTai Andhare🔥 (@andharesushama) May 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“कोणी तुमचा ऊस नेला नाही तर हाय पठ्ठ्या..,”अन् अजितदादांनी भरसभेत शेतकऱ्यांची जिंकली मनं
हेही वाचा…“सुप्रिया सुळेंविरोधात धनशक्तीचा वापर, व्हिडीओ पाहा,” रोहित पवारांचा मोठा दावा
हेही वाचा…“महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरीही…” तटकरेंची सभा रामदास आठवलेंनी गाजवली
हेही वाचा….“पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर”, मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास