पुणे : बारामती लोकसभा मतदारसंघात पहिल्यांदाच पवार विरूद्ध पवार अशी लढत होत आहे. महाविकास आघाडीकडून सुप्रिया सुळे तर महायुतीकडून सुनेत्रा पवार निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर दोन्ही उमेदवारांनी आपला जोरदार प्रचार करण्यास सुरूवात केली आहे. अशातच राष्ट्रवादी शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट करून भाजपवर निशाणा साधला आहे.
हेही वाचा…“काय वाटेल ती किंमत देऊ, पण या देशात आम्ही..,”मोदींच्या विरोधात शरद पवारांनी दंड थोपाटले
रोहित पवार यांनी एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात रोहित पवारांनी असं म्हटलंय की, बारामतीत सुप्रियाताईंच्या जनशक्तीविरोधात धनशक्तीचा कसा वापर होतो, याचा ट्रेलर बघायचा असेल तर हे व्हिडीओ बघा. मलिदा गॅंगने बंद पडलेल्या घड्याळाला कितीही चावी दिली तरी आता वेळ बदललीय आणि वारं फिरलंय, त्यामुळे बारामतीत तर वाजणार स्वाभिमानीचच तुतारी वाजणार असेही त्यांनी म्हटलंय.
हेही वाचा…महायुतीची वज्रमूठ, मोदींच्या सभेमुळे आढळरावांची ताकद वाढली
दरम्यान, बारामती लोकसभा मतदारसंघासाठी येत्या तीन चार दिवसात मतदान होणार आहे. त्यामुळे बारामतीत महाविकास आघाडी तसेच महायुतीकडून जोरदार प्रचार केला जात आहे. अशातच आता काही व्हिडीओ समोर आली आहेत.
बारामतीत सुप्रियाताईंच्या जनशक्तीविरोधात धनशक्तीचा कसा वापर होतो, याचा ट्रेलर बघायचा असेल तर हे व्हिडिओ बघा…
#मलिदा_गँगने बंद पडलेल्या घड्याळाला कितीही चावी दिली तरी आता वेळ बदललीय आणि वारं फिरलंय.. त्यामुळं बारामतीत तर वाजणार स्वाभिमानाचीच #तुतारी… pic.twitter.com/T5cwwP38AR— Rohit Pawar (@RRPSpeaks) May 2, 2024
READ ALSO :
हेही वाचा…“महाविकास आघाडीची कितीही नाचत असतील भुते, तरीही…” तटकरेंची सभा रामदास आठवलेंनी गाजवली
हेही वाचा….“पुण्यातून आंतरराष्ट्रीय खेळाडू घडवण्यावर भर”, मुरलीधर मोहोळांनी व्यक्त केला विश्वास
हेही वाचा..‘अनंत गीते हिरवा साप, विद्वेष अन् वेगळी भावना निर्माण करण्याचा प्रयत्न “, तटकरेंचा घणाघात