नाशिक : काल मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्षप्रवेश केला आहे.मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. मला अशी अपेक्षा नव्हती कि भाजप मला अशा पद्धतीने वागणूक देईल, पण आता मोकळा श्वास सोडलंय आत प्रवेश करताना मी कुठलीही अट किंवा आमिष घेऊन राष्ट्रवादीत आलेलो नाही, मी प्रामाणिकपने राष्ट्रवादीच काम करणार आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटलं होत.
तसेच यांनी प्रवेश करतानाच्या भाषणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली होती. भाजपला शेटजी-भटजींचा पक्ष म्हटलं जात होतं. मारवाडी, भटांचा पक्ष अशी या पक्षाची ओळख होती.
मात्र ही ओळख पुसण्यासाठी आम्ही गोपीनाथ मुंडे, प्रमोद महाजन, अण्णा डांगें, पांडुरंग फुंडकर यासारख्या कार्यकर्त्यांनी अहोरात्र काम करुन पुसण्याचा प्रयत्न केला, अशी प्रतिक्रिया भाजपमधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केलेले भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांनी दिली.
२०१४ नंतर मात्र मी बहुजन मुख्यमंत्री झाला पाहिजे असं नुसतं म्हटलं होतं. तेव्हापासून माझ्यामागे चौकशीचा ससेमीरा लागला. मी चार वर्षे त्या ओझ्याखालीच होतो. भाजपमध्ये बहुजनांकडे दुर्लक्ष झालंय हे मान्यच करावं लागेल, असं मत एकनाथ खडसे यांनी मांडलं.
भाजपमध्ये गेले चारवर्ष मी भीतीच्या सावटाखाली वावरत होतो. कधी माझ्यामागे ईडी, कधी अँटीकप्शन तर कधी विनयभंगासारखी केस दाखल होईल, याची मला नेहमीच चिंता राहायची. आता सर्वांमधून मी निर्दोष सुटलो आहे. या सर्वातून बाहेर आल्यानंतर माझं टेन्शन कमी झालेलं आहे. आता इतरांना टेन्शन देण्याचं काम सुरु करणार आहे, असा टोला खडसेंनी लगावला.
२०१४ ला भाजप सरकार आल्यापासून माझी पक्षात गळचेपी होत असल्याची तक्रार खडसे यांनी नेहमी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख हा नेहमी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचयाकडे असायचा. पण आता या सर्व वादांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला आहे. खडसे असताना सामाजिक कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. आणि त्या आरोपांना फडणवीसांचे बळ आहे असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
Read Also ;
धक्कादायक: विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना कोरोनाची लागण https://t.co/mvg6xBTJUu @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 24, 2020