IMPIMP
After Sule's victory, Rohit Pawar scolded Ajit Pawar After Sule's victory, Rohit Pawar scolded Ajit Pawar

“बच्चा बडा हो गया”, सुळेंच्या विजयानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं

पुणे : राज्यात सर्वात जास्त चर्चेत राहिलेल्या बारामती लोकसभा मतदारसंघात विद्यमान खासदार सुप्रिया सुळे यांनी आपला गड कायम राखला आहे. अजित पवार यांच्या अथक परिश्रमानंतरही याठिकाणी सुळेंनी सुनेत्रा पवार यांचा लाखांच्या मताधिक्क्याने पराभव केला आहे.  याची देशात आता एकच चर्चा सुरू झालीय. याच पार्श्वभूमीवर शरद पवार गटातील आमदार रोहित पवार यांनी अजित पवारांना डिवचलं आहे.

हेही वाचा..तर नरेंद्र मोदींची सत्ता जाणार, सत्ता स्थापन करण्यात नितीश कुमार अन् चंद्राबाबू नायडू किंग मेकरच्या भूमिकेत

बारामती लोकसभा मतदारसंघातून सुनेत्रा पवारांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांत जोरदार आरोप-प्रत्यारोप झालेत. यातच रोहित पवार आणि अजित पवार यांच्यात तर खुपदा शाब्दिक टोलेबाजी झाली. यातच प्रचारादरम्यान तर अजित पवारांनी थेट रोहित पवारांना धमकीच दिली होती. यातच आता सुप्रिया सुळे जिंकून आल्यानंतर रोहित पवारांनी अजित पवारांना डिवचलं आहे.

हेही वाचा..“आशिष शेलारजी..! संन्यासाची तारीख कधी जाहीर करताय”,शेलारांनी अंधारेंनी करून दिली जूनी आठवण 

दरम्यान, रोहित पवारांनी एक ट्विट केला आहे. त्यात बच्चा बडा हो गया असं म्हणत काही नेत्यांना वाटतं की नवीन पिढीला नेता बनण्याची घाई झालीय; पण त्यांना सांगायचंय की, नेता बनण्याची घाई नाही तर सध्या ज्या खालच्या पातळीला राजकारण गेलं त्याचा स्तर सुधारण्याची मात्र नक्कीच घाई झालीय! बारामतीत सुप्रियाताईंचा विजय  हा आदरणीय पवार साहेबांच्या विचारांचा, सुप्रियाताईंच्या कष्टाचा, मविआ चे सर्व पदाधिकारी व सामान्य कार्यकर्ते यांच्या त्यागाचा आणि दडपशाहीला झुगारलेल्या स्वाभिमानी सामान्य जनतेच्या प्रेमाचा आहे. या दणदणीत विजयाबद्दल सुप्रियाताईंचं मनापासून अभिनंदन!

READ ALSO :

हेही वाचा…“मला सरकारमधून मोकळं करा”, फडणवीसांचं मोठं विधान, राज्यात राजकीय उलथापालथ ?? 

हेही वाचा…मोठी बातमी…! पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला पंतप्रधान पदाचा राजीनामा 

हेही वाचा..आता अजितदादा गटात होणार मोठा राजकीय भुंकप, १२ आमदारांची होणार शरद पवार गटात घरवापसी 

हेही वाचा..“स्वत: ला ईश्वराचा अवतार समजणाऱ्या नरेंद्र मोदींचा दारूण पराभव” 

हेही वाचा..कॉंग्रेसला मिळाल्या सर्वाधिक १३ जागा, नागपुरात लागले पटोलेंचे भावी मुख्यमंत्री म्हणून बॅनर