IMPIMP
After the Lok Sabha elections, there is a possibility of a big conflict in the Grand Alliance After the Lok Sabha elections, there is a possibility of a big conflict in the Grand Alliance

लोकसभा निवडणुकीनंतर महायुतीत मोठा संघर्ष होण्याची शक्यता, विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठा ट्विस्ट

नाशिक : नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरूवात झाली आहे. यासाठी येत्या २६ जून रोजी मतदान होणार असून त्याचा निकाल येत्या ०१ जुलैला लागणार आहे. मात्र महायुतीत उमेदवारीवरून मोठा संघर्ष निर्माण होण्याची शक्यता आहे. कारण याठिकाणी अजित पवार गटाने अॅड. महेंद्र भावसार यांची उमेदवारी जाहीर केलीय. मात्र भाजपचे विद्यमान आमदार किशोर दराडे यांनी देखील निवडणुक लढविण्यासाठी इच्छा व्यक्त केलीय. त्यामुळे मोठा गोंधळ निर्माण झालाय.

हेही वाचा..अवघ्या ६ हजार मतांनी पराभव, आता पंकजा मुंडे काढणार आभार दौरा

महाविकास आघाडीकडून ठाकरेंनी संदीप गुळवे यांना उमेदवारी दिली आहे. संदीप गुळवे आज आपला उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत. तर नाशिक शिक्षक मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे अॅड. महेंद्र भावसार यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यातच किशोर दराडे यांच्यासह महायुतीकडून भाजपचे युवा नेते विवेक कोल्हे आणि महसुल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे हे दोघेही भाजपकडून निवडणुक लढविण्यास इच्छूक आहेत.

हेही वाचा..“एक गुगली … २ विकेट पडणार क्या गेम ? एक बॉल.. दो विकेट” आव्हाडांच्या ट्विटने खळबळ 

ॲड. महेंद्र भावसार हे गेले ३४ वर्षांपासून वकिली व्यवसायात कार्यरत असून त्यांना शिक्षकांसाठी असलेल्या कायद्यांचा सखोल अभ्यास आहे. शाळा न्यायाधिकरणाच्या धुळे, जळगाव, नाशिक नंदुरबार या विभागातील शिक्षकांच्या सुमारे ५०० हून अधिक केसेस त्यांनी लढवून शिक्षकांना न्याय मिळवून दिला आहे. अन्यायाने पीडित शिक्षकांसाठी भावसार यांनी वेळोवेळी आंदोलने केली आहेत. शिक्षकांच्या न्याय-हक्कांसाठी त्यांची कायम आग्रही भूमिका राहिली आहे.

दरम्यान,  अॅड. संदीप गुळवे यांचे शिक्षण बी. ए. एल. एल.बी पर्यंत झालेले असून नाशिक जिल्हा परिषदेचे २०१२ पासून २०१७ पर्यंत ते सदस्य होते. महाराष्ट्रातील बलाढ्या शिक्षण संस्था म्हणून लौकिक असलेल्या मराठा विद्या प्रसारक मंडळाचे ते संचालक आहेत. तर नाशिक जिल्हा बॅंकेचे संचालक म्हणून त्यांनी कामगिरी बजावलीय.

READ ALSO :

हेही वाचा…“देशात एनडीएचं सरकार चालवतांना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येईल” 

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात पुन्हा राजकीय बंड, शिंदे गटाचे ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात ? 

हेही वाचा…विधानसभा निवडणुकीपुर्वी राज्यात पुन्हा राजकीय बंड, शिंदे गटाचे ६ आमदार ठाकरेंच्या संपर्कात ? 

हेही वाचा..पंकजा मुंडेंच्या निसटत्या पराभवामुळे महायुतीचे सहा आमदार आता गॅसवर 

हेही वाचा..मंत्रीमंडळाचा विस्तार होणार की नाही ? सुनील तटकरे म्हणाले..