IMPIMP
After the Lok Sabha, Sharad Pawar is now targeting the Legislative Assembly, preparations are underway before the election announcement After the Lok Sabha, Sharad Pawar is now targeting the Legislative Assembly, preparations are underway before the election announcement

लोकसभेनंतर शरद पवारांचं आता विधानसभेवर लक्ष्य, निवडणुक घोषणेच्या आधीच तयारी सुरू

बारामती :  लोकसभा निवडणुकीत शरद पवारांनी सुप्रिया सुळेंसाठी चांगलीच कंबर कसली होती. त्यामुळेच बारामतीत सुनेत्रा पवारांचा मोठा पराभव झाल्याची माहिती समोर आली. यातच आता बारामती विधानसभा मतदारसंघातून शरद पवार गटाकडून युगेंद्र पवार तयारी करत असल्याची माहिती आहे. तर याठिकाणी अजित पवार विरूद्ध युगेंद्र पवार अशी लढत होण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त करण्यात येत आहे. याच पार्श्वभूमीवर शरद पवारांनी आता मतदारसंघात फिरण्यास सुरूवात केलीय.

हेही वाचा..मतदारसंघात एकही आमदार नाही, तरीही ठाकरेंचा उमेदवार विजयी, पाहा नेमकं काय घडलं ? 

लोकसभेच्या निवडणुकीला जे करायचं ते तुम्ही केलं. आता विधानसभेची निवडणूक आली तिथेही योग्य आहे ते करा आणि उद्या हे सगळे प्रश्न आहेत.  मग ते या तालुक्यातले असतील, काही इंदापूर तालुक्यातले असतील, हे जे पाणी खराब आहे, निऱ्यापासून ते खालपर्यंत सगळीकडे याचा त्रास आहे आणि यासंबंधीचे निकाल राज्य सरकारला घ्यावे लागतील, ते काम आपण वेळोवेळी या ठिकाणी करू. असं आश्वासन देत शरद पवारांनी बारामती मतदारसंघातील निरा वागज गावातील शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यामुळे लोकसभेनंतर आता शरद पवारांनी विधानसभेकडे लक्ष दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झालीय.

हेही वाचा…नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा 

मी नेहमी सांगतो या देशात लोकशाहीचे राज्य आहे. मतदान करायला लोक जातात आणि त्यांच्या मनाला जे वाटतं ते बटण दाबतात. काही लोक निवडून येतात किंवा पराभूत होतात. या देशाची लोकशाही टिकली तर तुमच्यासारख्या कोट्यावधी लोकांनी शहाणपणाने मताचा अधिकार गाजवला. आता याच निवडणुकीमध्ये गावचे नेते होते त्यांना मत दिली ते कुठे आसपास दिसत नाहीत. काही ठिकाणी तर दमदाटी केली तरी लोकांनी काय केलं? असा सवाल देखील त्यांनी यानिमित्ताने उपस्थित केलाय.

दरम्यान,  तर जगताप ज्या संघटनेचे अध्यक्ष आहेत, सातव बारामतीचे माजी नगराध्यक्ष आहेत, नवले हे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते. ही मंडळी निवडणुकीसाठी गावात यायची आणि कोणी त्यांना भेटायला तयार नव्हतं. पण मतदान ज्या दिवशी झालं मतमोजणी झाली.  तेव्हा कळलं की गाव मोठ्यांच्या हातात नाही. गावातल्या लोकांनी मोठ्यांची किंमत केली आणि जनतेच्या मागण्यांची किंमत मोठ्या नेत्यांनी केली नाही तर त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम न डगमगता विशेषतः सामान्य लोक, तरुण पिढी यांनी करून दाखवली. अशी आठवण  देखील त्यांनी यावेळी व्यक्त केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..‘मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा नीट हाताळला नाही,’ फडणवीस अन् बावनकुळेंवर केंद्रीय नेतृत्वाचा ठपका 

हेही वाचा…“नाना पटोले माझं दैवत , एकदा काय दहा वेळा पाण्याने पाय धुवेन,” कट्टर कार्यकर्त्यांचा जोरदार पलटवार 

हेही वाचा..“पुण्याच्या विकासासाठी ‘सात खासदार’ एक साथ साथ येणार का ?”‘ रेड झोन’ चा प्रश्न सोडवण्यासाठी वज्रमूठ करतील काय? 

हेही वाचा..“तुम्ही शिवसेनेच्या चिन्हावर लढा, मी कमळाच्या चिन्हावर लढतो,” अमोल शिंदेंचं किशोर पाटलांना आव्हान 

हेही वाचा…“छगन भुजबळ नाही तर संपुर्ण अजितदादा गटातील आमदार रामराम ठोकणार”, राज्यात पुन्हा राजकीय भूंकप ? 

Leave a Reply