IMPIMP
After the Shinde group, now the Ajit Pawar group is also in the ministerial position After the Shinde group, now the Ajit Pawar group is also in the ministerial position

शिंदे गटानंतर आता अजित पवार गटातही मंत्रीपदावरून खदखद, आण्णा बनसोडे थेट स्पष्टच बोलले

पुणे : एनडीए आघाडीमध्ये सर्वात जास्त तिसऱ्या क्रमांकावर शिवसेना शिंदे गटाचे सात खासदार निवडून आले आहेत. पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांना देखील कॅबिनेट मंत्री देण्यात आलं. परंतु शिवसेना पक्षाबाबात केंद्रात दुजाभाव केला आहे. एक कॅबिनेट मंत्री पद देखील देतील अशी अपेक्षा होती. परंतु तसं काही झालं नाही. असं म्हणत शिवसेना शिंदे गटाचे खासदार श्रीरंग बारणे यांनी नाराजी व्यक्त केलीय. त्यावर आता अजित पवार गटाकडून देखील नाराजी व्यक्त करण्यात आली आहे.

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन 

नरेंद्र मोदी यांनी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची शपथ घेतली. यावेळी त्यांच्यासह ७२ मंत्र्यांना राष्ट्रपतींनी गोपनियतेची शपथ दिली. तर महाराष्ट्रातून भाजपचे चार शिवसेना शिंदे गटाचे एक आणि एक आठवले गटाला मंत्रीपद देण्यात आलं. मात्र आता यावरून शिंदे तसेच अजित पवार गटाकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. यातच श्रीरंग बारणे यांच्यानंतर अजित पवार गटातील आमदार अण्णा बनसोडे यांनी देखील यावरून नाराजी व्यक्त केली आहे.

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

आण्णा बनसोडे म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये घटक पक्षांना दाबण्याचा प्रयत्न होत असेल असं मला वाटत नाही. परंतु यावेळी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. त्यांना एक कॅबिनेट आणि एक राज्यमंत्री पद द्यायला हवं होतं. तसेच आगामी काळात राज्यात विधानसभेच्या निवडणुका होत आहेत. एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे दोन्ही नेते महाराष्ट्रात प्रभावी असून त्यांना केंद्रात एक एक कॅबिनेट मंत्री पद देखील द्यायला पाहिजे होतं. अशी खंत देखील अण्णा बनसोडे यांनी व्यक्त केलीय.

दरम्यान, इतर राज्याच्या तुलनेत महाराष्ट्रातल्या घटक पक्ष्यांवरती अन्याय झाल्याचे दिसत आहे. राज्याला फक्त सात मंत्री पद देण्यात आली आहे. इतर राज्यामध्ये तर एखाद्या पक्षाचा एकच खासदार असून त्याला देखील कॅबिनेट मंत्री पद देण्यात आलंय. वास्तिवक महाराष्ट्राला विधानसभेच्या दृष्टीकोणातून जास्तीत जास्त मंत्री पद द्यायला हवी होती. परंतु यावेळी महाराष्ट्राला झुकतं माप देण्यात आलं आहे. असेही ते म्हणाले.

READ ALSO :

हेही वाचा..“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर 

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं 

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत 

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त