नवी दिल्ली : कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते अहमद पटेल यांनाही कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. याबाबत त्यांनी एका ट्विट करत ही माहिती दिली आहे
राज्यसभेचे खासदार अहमद पटेल यांनी ट्विट करत ही माहिती दिली आहे , ‘तपासणीत मला कोरोना संसर्ग झाल्याचं निष्पन्न झालं आहे. अलीकडेच माझ्याशी संपर्क साधलेल्या लोकांनी स्वत: ला वेगळे करावे, असं आवाहन मी करतो. अहमद पटेल यांनी नुकत्याच संसदेच्या संपलेल्या पावसाळी अधिवेशनात भाग घेतला होता.
I have tested positive for Covid19. I request all those who came in close contact with me recently, to self isolate
— Ahmed Patel (@ahmedpatel) October 1, 2020
अहमद पटेल यांना कोरोना विषाणूची लागण झाल्याची माहिती कळताच कॉंग्रेसचे नेते जयराम रमेश, मुकुल वासनिक, कॉंग्रेसचे माजी प्रवक्ते आणि सध्या शिवसेना नेते प्रियंका चतुर्वेदी यांच्यासह अनेक नेत्यांनी त्यांची प्रकृती सुधारण्यासाठी शुभेच्छा दिल्या.
Read Also :
रामाचं नाव घ्यायचं कृती नथुरामाची करायची ! राष्ट्रवादीचा भाजपवर हल्लाबोलhttps://t.co/25KtPtuMZo#RahulGandhi #SupriyaSule #sharadpawar #NCP #BJP
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 1, 2020