IMPIMP
Ajit Dada's leader's support for Thackeray's candidate increased in Nashik teacher constituency election Ajit Dada's leader's support for Thackeray's candidate increased in Nashik teacher constituency election

नाशिक शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीत वाढली रंगत , अजितदादाच्या नेत्याचा ठाकरेंच्या उमेदवाराला पाठिंबा

नाशिक : येत्या २६ जुलै रोजी राज्यातील विधान परिषदेच्या चार जागांसाठी मतदान पार पडणार आहे. यातच नाशिक शिक्षक मतदारसंघातून महायुतीकडून शिवसेनेचे किशोर दराडे निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडून ठाकरेंचे  संदीप गुळवे यांना संधी देण्यात आलीय. यातच आता अजित पवार गटाचे नेते नरहरी झिरवळ यांनी आपला पाठिंबा संदीप गुळवे यांना जाहीर केल्याने अनेकांनी यावर भुवया उंचवल्या आहेत. स्वत: नरहरी झिरवळ यांनी आपल्या कार्यकर्त्यांना संदीप गुळवे यांचं काम करण्याच्या सुचना दिल्या आहेत. त्यामुळे याची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू झालीय.

हेही वाचा…“वेड्यांचा बाजार भरवणाऱ्यांना मी उत्तर देणार नाही,” म्हणून.. दिलीप वळसे पाटलांनी आव्हाडांना सुनावलं

आज नरहरी झिरवळ यांचा वाढदिवस असून शुभेच्छा देण्यासाठी संदीप गुळवे यांनी त्यांची भेट घेतली. यावेळी कॉंग्रेसचे आमदार हिरामण खोसकर देखील उपस्थितीत होते. यांच्यात बंद दाराआड काही वेळ चर्चाही झाली. त्यानंतर बाहेर येऊन आपला पाठिंबा संदीप गुळवे यांना झिरवळांनी जाहीर केला. कौटुंबिक संबंधामुळे संदीप गुळवेंना पाठिंबा देत असल्याचं यावेळी झिरवळ म्हणाले. तसेच संदीप गुळवे यांना माझ्या अगोदर सुभेच्छा देई असं वाटत. शिक्षक मतदारसंघात पक्षायी गणित बाजूला ठेऊन पाठिंबा देत असल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं.

हेही वाचा…“नवनीत राणांचा पराभव करण्यासाठी बच्चू कडूंना मातोश्रीवरून रसद”, रवी राणांचा गंभीर आरोप 

दरम्यान, वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी गेलेल्या संदीप गुळवे यांना आगळंवेगळं रिटर्न गिप्त मिळाल्याने यांची राजकीय वर्तुळात चांगलीच चर्चा सुरू आहे. तर महायुतीत याचे मोठे परिणाम बघायला मिळण्याची शक्यता आहे. यातच आता येत्या ०४ जूलै रोजी काय निकाल लागणार ? त्याकडेही सगळ्यांचं लक्ष लागून राहिलं आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“तुकाराम मुंडेंची आता अमेरिकेत किंवा रशियात बदली करा,” विजय वडेट्टीवारांचा खोचक टोला 

हेही वाचा…‘कचरा मुक्त कसबा मतदारसंघा’ची संकल्पना, हेमंत रासने यांचे पुणे महानगरपालिका प्रशासनाला निवेदन

हेही वाचा..चिखलात माखलेले पाय पटोलेंनी कार्यकर्त्यांकडुन घेतले धुवून, व्हिडीओ व्हायरल 

हेही वाचा…“फडणवीसांनी मला या सगळ्या मोठ्या संकटातून वाचवलं “, नरेश म्हस्केंनी सांगितला विधान परिषदेचा किस्सा 

हेही वाचा..ओबीसींसाठी छगन भुजबळ पुन्हा मैदानात, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे करणार ‘ही’ मागणी 

 

Leave a Reply