IMPIMP
Petrol and diesel have become cheaper in the state by so many rupees, Ajit Pawar made a big announcement Petrol and diesel have become cheaper in the state by so many rupees, Ajit Pawar made a big announcement

लेक लाडकी योजनेची अजित पवारांकडून घोषणा, महिलांना प्रतिमहिना मिळणार इतके रूपये

मुंबई : राज्याचे अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज महायुती सरकारचा अर्थसंकल्प सादर केला. अर्थसंकल्प सादर करताना अजित पवारांनी विठ्ठाला प्रमाण करत वारकऱ्यांच्या दिंडीसाठी आम्ही भरीव मदत दिली. दिंडीदरम्यान आम्ही वारकऱ्यांची तपासणी करू. असेही अजित पवारांनी म्हटले. याच दरम्यान अजित पवारांनी लेक लाडकी या योजनेची मोठी घोषणा केली आहे.

हेही वाचा..भाजपच्या स्थानिक नेत्यांची अजितदादांवर नाराजी, 18 ते 19 आमदार शरद पवारांच्या संपर्कात 

यावेळी अजित पवार म्हणाले की, स्त्री हा कुटुंबाचा आधार आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या महिलाही आपल्याला पाहायला मिळत आहेत. या महिलांना संधी उपलब्ध करून देणे ही सरकारची जबाबदारी आहे. म्हणूनच आमच्या लेकी बहिणींसाठी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची मी घोषणा करत आहे. ही एक व्यापक आणि महत्वाकांक्षी योजना आहे. महिलांचे स्वावलंबन, पोषण अशा सर्वांगीण विकासासाठी या योजनेअंतर्गत २१ ते ६० वर्षे पात्र महिलांना दरमहा दीड हजार रूपये देण्यात येईल. यासाठी दरवर्षी ४६ हजार कोटी रूपयांचा निधी उपलब्ध करण्यात येईल. या योजनेची अंमलबजावणी जुलै २०२४ पासून करण्यात येईल.

हेही वाचा..“महाराष्ट्राचं राजकारण सहानुभतीवर चालतं, विधानसभेतही चालणार “

याचदरम्यान अजित पवारांनी मुख्यमंत्री अन्नपुर्णा योजनेचीही घोषणा केली आहे. या योजनेनुसार महिलांना वर्षाला तीन गॅस सिलिंडर मोफत मिळणार आहे. या योजनेचा फायदा ५२ लाख कुटुंबियांना होणार आहे. यासह बचत गटाच्या निधीत १५ हजारांहून ३० हजार रूपयांची वाढ केली जाणार आहे. तसेच यावर्षी २५ लाख महिलांना लखपती दिदी बनवण्याचा शासनाचा विचार आहे. व्यावसायिक शिक्षणामध्ये आठ लाख रूपयांचे उत्पन्न असलेल्या मुलींना शंभर टक्के सवलत दिली जाणार असल्याची माहिती देखील अजित पवारांनी दिलीय.

READ ALSO :

हेही वाचा…पोर्शे कार अपघात प्रकरणात फोन कोणी केले ? दबाव कोणी आणला ? आव्हाडांचे परखड सवाल, फडणवीसांनी दिलं हे उत्तर

हेही वाचा..“हेमंत सोरेन यांच्या १४९ दिवसांच्या लढ्याला आज न्यायाचा मार्ग मिळाला”, शरद पवारांनी एनडीए सरकारकडे केली ‘ही’ मागणी 

हेही वाचा…शेकापच्या जयंत पाटलांना कॉंग्रेस अन् शरद पवार गटाचा पाठिंबा, परंतु ठाकरे गट…? 

हेही वाचा..फडणवीस अन् ठाकरेंचा एकाच लिप्टमधून प्रवास, ठाकरे महायुतीत जाणार का ? 

हेही वाचा..भाजपकडून विधानपरिषदेच्या ०५ जागांसाठी ११ नावांचा विचार..! कुणाला मिळणार संधी ? 

Leave a Reply