IMPIMP

विधानसभेत राष्ट्रवादीला किती जागा मिळणार ? अजित पवारांनी थेट आकडाच सांगत दिल्या सुचना

मुंबई : लोकसभेत झालेला पराभव विसरून अजित पवार गटांनी आता विधानसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. यातच मुंबईत झालेल्या बैठकीत अजित पवार यांनी कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना निवडणूकीच्या तयारीला लागा असे आदेशही दिले आहेत. याचसोबत आगामी विधानसभा निवडणूक ही महायुतीत लढणार असून आपल्या वाट्याला किती जागा येणार. याबाबत देखील अजित पवारांनी पदाधिकाऱ्यांना सांगितले आहे.

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेना शिंदे गट, भाजप आणि अजित पवार गटांनी उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. यासाठी पक्षाच्या बैठका, जाहीर मेळावे देखील सुरू केले आहेत. यातच मुंबईत अजित पवारांच्या उपस्थितीत पक्षाची महत्वाची बैठक पार पडली. या बैठकीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेत्यांनी काय करावे काय करू नये यासंदर्भात मार्गदर्शन करण्यात आले. याचसोबत राज्य सरकारने सुरू केलेल्या योजना प्रत्येकांपर्यंत पोहचवणे आणि त्या योजनांचा प्रचार प्रसार करावे अशा सुचना देखील अजित पवारांनी दिल्या.

लोकसभा निवडणुकीप्रमाणेच विधानसभा निवडणुकीत देखील जागावाटपाचा पेच निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अजित पवार गटातील नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आधीच ८० ते ९० जागांची मागणी केली. त्यातच आज अजित पवारांनी देखील विधानसभेसाठी आपल्याला ८५ जागा मिळतील असा दावा केला आहे.

दरम्यान, विधानसभेच्या एकूण २८८ जागांपैकी महायुतीत आता जागावाटप कसं होणार ? ते पाहणं महत्त्वाचे ठरणार आहे. सध्या भाजपचे आमदार जास्त असून अजित पवार आणि एकनाथ शिंदे यांचे समसमान प्रमाणात आमदार आहेत. यातच विद्यमान आमदारांच्या जागेनुसार जागावाटप करण्यात आले तर महायुतीत मोठा घोळ होण्याची शक्यता आहे. कारण मागच्या निवडणुकीत एकमेकांच्या विरोधात लढलेल्या नेत्यांना मनाविरुद्ध काम करावं लागेल. त्यामुळे जागावाटपाचा हा पेच नेमका कसा सोडवला जाऊ शकते. त्याची अधिक चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.

Leave a Reply