IMPIMP
Ajit Pawar group has announced its candidate on the seat of BJP Ajit Pawar group has announced its candidate on the seat of BJP

भाजपच्या जागेवर अजित पवार गटाने जाहीर केला उमेदवार, विधानपरिषदेच्या निवडणुकीत महायुतीत संघर्ष वाढणार

मुंबई : लोकसभा निवडणुकीचा निकाल लागण्याच्या आधीच विधान परिषदेच्या निवडणुकीची राज्यात तयारी सुरू झाली आहे. चार जागांसाठी होत असलेल्या निवडणुकीकरीता सगळेच पक्ष आपला उमेदवार उतरविण्याच्या तयारीत दिसत आहेत. अशातच काल मुंबई शिक्षक मतदारसंघातून अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून शिवाजीराव नलावडे यांची घोषणा केली आहे. त्यामुळे महायुती तसेच महाविकास आघाडीत सुप्त संघर्ष बघायला मिळण्याची शक्यता अधिक वाटू लागली आहे.

हेही वाचा…मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू 

काल मंबई येथे पत्रकार परिषद घेऊन प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवाजीराव नलावडे यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. त्याआधी याच मतदारसंघातून ठाकरे गटाकडून ज.मो. अभ्यंकर यांच्या उमेदवारीची घोषणा केली आहे. सध्या याठिकाणी भाजपचे कपिल पाटील आमदार आहेत. त्यामुळे भाजप देखील या मतदारसंघातून आपला उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार का ? अशी चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

दरम्यान, विधानपरिषदेच्या चार जागांसाठी येत्या २६ जून रोजी मतदान पार पडणार असून त्याचा निकाल ०१ जूलैला लागणार आहे. विधानपरिषदेत मुंबई पदवीध मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणारे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचे विलास पोतनीस, कोकण पदवीधर मतदारसंघातील भाजपचे निरंजन डावखरे, मुंबई शिक्षक कपिल पाटील व नाशिक शिक्षकचे किशोर दराडे यांची सदस्यस्वाची मुदत ७ जुलै २०२४ रोजी संपणार आहेत. त्यामुळे या चार जागांसाठी निवडणुक जाहीर झाली आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“खर्गेंनी मोदींना डिवचलं,” तोच व्हिडीओ बावनकुळेंनी दाखवत राऊतांवर साधला निशाणा 

हेही वाचा..“हाच आहे का महायुती सरकारचा गतिमान कारभार ?” पुण्याचे पालकमंत्री कुठे आहेत ? 

हेही वाचा..छगन भुजबळांचा यू-टर्न, म्हणाले, “एवढा काही मी मुर्ख नाही की…,” 

हेही वाचा…“जेव्हा आम्ही सरकार स्थापन करू, तेव्हा तपशीलवार चौकशा करू,”आदित्य ठाकरेंनी दिला इशारा

हेही वाचा…विश्वासघात अन् फोडाफोडीचं राजकारण, राज्यात मतदानाची टक्केवारी घरसली, कोणाला बसणार फटका ?