IMPIMP
Ajit Pawar group has no place in Modi's new cabinet big uproar in Delhi Ajit Pawar group has no place in Modi's new cabinet big uproar in Delhi

“मोदींच्या नव्या मंत्रिमंडळात अजित पवार गटाला स्थान नाही”, दिल्लीत मोठी खलबतं

मुंबई : नरेंद्र मोदी आज तिसऱ्यांदा देशाचे पंतप्रधानपदाची शपथ घेणार आहेत. यातच राज्यातून भाजपच्या नऊ जागा जिंकून आल्या आहेत. यातील काही खासदारांची केंद्रात वर्णी लागण्याची शक्यता आहे. तर आज पंतप्रधान कार्यालयाकडून नितीन गडकरी, पियुष गोयल, रक्षा खडसे तसेच पुण्यातील पहिल्यांदाच खासदार झालेले मुरलीधर मोहोळ यांना फोन आला आहे. त्यामुळे त्यांचं मंत्रीपद निश्चित झालं अशी माहिती आहे. यातच केंद्रात अजित पवार गटाला एकही मंत्री न मिळणार असल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे दिल्लीत सध्या बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे.

हेही वाचा..“ही प्रभू श्रीरामांचीच लीला..!”, प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना ज्या ज्या ठिकाणी गेले तिथे भाजपचा पराभव

राष्ट्रपती भवनासमोर नरेंद्र मोदी यांच्यासह मंत्रिमंडळाचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे. या सोहळ्यासाठी इतर देशातील बडे नेते देखील दिल्लीत दाखल झाले आहेत. यातच राज्यातून महायुतीतील शिवसेना शिंदे गटासह, भाजपसह माजी मंत्री रामदास आठवले यांना देखील फोन आल्याची माहिती आहे. मात्र एक जागा जिंकलेल्या अजित पवार गटाला केंद्रात स्थान न मिळणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.

हेही वाचा..“मी आता थांबणार नाही, शांत बसणार नाही”, लोकसभेचा निकाल फडणवीसांच्या जिव्हारी, केली मोठी घोषणा

त्याच पार्श्वभूमीवर कालपासून प्रफुल्ल पटेल यांच्या निवासस्थानी बैठकांचा सपाटा सुरू झाला आहे. यातच सध्या अजित पवार गटातील छगन भुजबळ, अजित पवार, सुनील तटकरे यांच्यासारखे बडे नेते दिल्लीत दाखल झाले आहेत. अजित पवार गटात फक्त सुनील तटकरे लोकसभा निवडणुकीत निवडून आले आहेत. तर राज्यसभेवर प्रफुल्ल पटेल यांची निवड झालीय. यातच काल अजित पवार गटाला एक मंत्रीपद मिळणार अशी चर्चा होती. मात्र आज दिलेल्या सुत्रांनी माहितीनुसार त्यांना केंद्रात स्थान नसल्याचं सांगण्यात येत आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांना केंद्रात मंत्रीपदाची लॉटरी, आज मंत्रीपदाची शपथ घेणार ? 

हेही वाचा…“शरद पवारांना मी सोडायला नव्हतं पाहिजे होतं”, कुणी केली खंत व्यक्त 

हेही वाचा..ठरलं तर मग..! येत्या एक दोन आठवड्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होणार ? 

हेही वाचा..महालक्ष्मी रेसकोर्सची जमीन घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या अन् भाजपच्या बिल्डर-कंत्राटदार मित्रांना सोपवायचा मनसुबा

हेही वाचा…“बारामतीत कुणी धमक्या देत असेल तर त्याचा करेक्ट कार्यक्रम करणार”, सुप्रिया सुळेंचा अजित पवारांना इशारा