IMPIMP
Ajit Pawar said that those who have muscle and money power can win elections Ajit Pawar said that those who have muscle and money power can win elections

“ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे, असेच लोक निवडणुक जिंकू शकतात”

बारामती :  नगरपरीषद अध्यक्ष आणि ग्रामपंचायतीचे सरपंच थेट जनतेतून निवडण्याचा  महत्वाचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आहे. यावरून विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी राष्ट्रपती आणि मुख्यमंत्रीही जनतेतुन निवडा असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर लगावला आहे.

“तर शिंदे सरकारची ही पद्धत छत्रपती संभाजी महाराजांना आवडली असती का?”

नगराध्यक्ष वे सरपंच जनतेतुन निवडण्याच्या भुमिकेवर अजित पवार म्हणाले की, या प्रश्नाबाबत दोघांच्या मंत्रमंडळात खूप घाई झालेली दिसत आहे. सरपंच व नगराध्यक्ष इतर विचारांचे असतील तर काय होते याचा अनुभव या पुर्वी घेतलेला आहे. अधिकाराचे केंद्रीकरण ही बाब लोकशाहीला घातक आहे. ज्यांच्याकडे मसल व मनी पॉवर आहे,  असेच लोक निवडणुक जिंकू शकतात, असंही अजित पवार हे म्हणाले.

“राज्यात एक दुजे के लिए सिनेमा सुरु, सिनेमाचा अंत ही तसाच होईल” 

लोकशाहीमध्ये काही परंपरा असतात. 1967 मध्ये यशवंतराव चव्हाण यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांची निर्मिती केली, त्यांनी ही धोरणे ठरवली, तेही दुरदृष्टीचेच नेते होते. बहुमत ज्या पक्षाला असते त्यांचे खासदार पंतप्रधान ठरवतात. राज्यातही 145 आमदारांचा पाठिंबा असलेले मुख्यमंत्री होतात.  त्याच पद्धतीने याही निवड होत होत्या तशाच पद्धतीने नगराध्यक्ष व सरपंच निवडले गेले असते तर बरे झाले असतं, असेही अजित पवार म्हणाले.

“धनुष्यबाणाची शपथ घेऊन सांगतो की, एकही बंडखोर आमदार निवडून येणार नाही” 

विधिमंडळात हा मुद्दा मांडून चर्चा करून ज्या सुचना येतील त्यांच्या विचार करून मगच हा निर्णय घ्यायला हवा होता. प्रत्यक्षात तसे काही घडले नाही. आमदारांचे मत यात विचारातच घेतले गेलं नाही. याचसोबत मंत्रिमंडळाचा विस्तार झाला नाही, पुरपरिस्थिती असताना पालकमंत्री नेमुन त्यांच्यावर का जबाबदारी दिली जात नाही. जनतेला महापुराचा त्रास होत आहे. दुबार पेरणी करावी लागणार आहे. भात शेताचे नुकसान झाले आहे.  त्याचे पंचनामे करावेत. पुरग्रस्तांना सरकारने मदतीचा हात दयायला हवा, असं अजित पवार म्हणाले.

Read also