अजित पवार म्हणलं की रोखठोकपणा आणि स्पष्टपणा हा येतोच. तसेच ते आपल्या बोलण्यातून आणि भाषणातून अनेकदा विनोदी फुलवतात. अशीच प्रतीती बुधवारी झालेल्या विधानभवनात कार्यक्रमात दिसून आली. अजित पवार यांनी यावेळी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना चांगलाच टोला लागावला.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळा बुधवारी विधानभवनात पार पडला. त्यावेळी अजितदादांनी केलेल्या कृतीमुळे एक आदर्श उदाहरण दाखवून दिले मात्र त्यांनी केलेल्या या कृतीतुन देवेंद्र फडणवीसांवर निशाणा साधला. त्यामुळे सभागृहात हास्याची कारंजी फुलली.
लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या जन्मशताब्दी वर्षाचा समारोप सोहळ्याप्रसंगी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचे भाषण झाले. फडणवीस यांच्या भाषणानंतर अजित पवार माईक जवळ आले. मात्र बोलायला सुरुवात करण्याअगोदर त्यांनी सॅनिटायझरचा स्प्रे काढला. “नको बाबा कोरोना होईल” असे म्हणत सॅनिटायझरचा फवारा माईक वर मारला. अजितदादांनी केलेल्या या कृतीमुळे सभागृहात मात्र हास्याचा फवारा उडाला.