IMPIMP

अजित पवार गटाने पक्ष प्रवेशासाठी दवाब टाकला, मात्र शरद पवारांचा शिष्य झुकला नाही

मुंबई : मागील काही दिवसांपासून राष्ट्रवादी अजित पवार घाटात अनेक राजकीय घडामोडी घडताना दिसत आहेत यातच शरद पवार गटातील राष्ट्रीय युवक अध्यक्ष धीरज शर्मा यांनी अजित पवार गटात प्रवेश केला तर राष्ट्रीय युवक अध्यक्ष सोनिया दुहान या देखील शरद पवार गटातून बाहेर पडणार असल्याचे त्यांनी संकेत दिले. त्यांनी खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. यातच आता शरद पवार गटातील राष्ट्रवादी काँग्रेस विद्यार्थी सेनेचे किरण शिखरे यांनी अजित पवार गटावर गंभीर आरोप करत पुन्हा शरद पवार गटात येण्याचा निर्णय घेतला आहे.

अजित पवार गटाने माझा बळजबरीने पक्ष प्रवेश करून घेतला’, असा खळबळजनक दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यार्थी नेते किरण शिखरे यांनी केला आहे. किरण शिखरे यांनी आज शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची भेट घेतली आणि त्यांच्यासोबत नेमका काय प्रकार घडला?

त्यानंतर जितेंद्र आव्हाड यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये किरण शिखरे यांनी हा दावा केला आहे. याचसोबत, ‘मी मरेपर्यंत शरद पवार गट आणि सुप्रिया सुळे यांच्यासोबत राहिल., असे त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

दरम्यान, यावेळी किरण शिखरे म्हणाले की, धीरज शर्मा आणि सोनिया दुहान हे माझे जवळचे सहकारी होते, त्यांना थांबवता आलं तर थांबवा, यासाठी मी प्रयत्न केले. माझ्यावर दबाव टाकू नका, असं मी त्यांना सांगितलं, पण माझं ऐकलं गेलं नाही. मला पार्टी कार्यालयात नेऊन माझ्यावर दबाव टाकून पक्ष प्रवेश करण्यासाठी जबरदस्ती केली होती. पण मी कोणत्याही आमीषाला बळी पडलो नाही. मी पक्षप्रवेश केला नाही, असंही किरण शिखरे यांनी स्पष्ट केलं.