मुंबई : भाजप नेते एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशानंतर आता उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे, अजित परर नाराज असल्याचं बोललं जात होत पण आता त्यांनी याबद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. त्यासंदर्भात त्यांनी ट्विट करून आपली भूमिका मंडळी आहे.
राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे. असं त्यांनी त्यांच्या ट्विट मध्ये म्हटलंय.
राज्याचे ज्येष्ठ नेते, माननीय श्री. एकनाथरावजी खडसे साहेबांचे मी @NCPspeaks पक्षामध्ये मनापासून स्वागत करतो. मा. खडसेसाहेब आणि रोहिणीताईंच्या पक्षप्रवेशानं राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच नवे बळ,ऊर्जा मिळाली आहे.
— Ajit Pawar (@AjitPawarSpeaks) October 23, 2020
भाजपमध्ये माझ्यावर प्रचंड अन्याय होत असताना मी दिल्लीतील भाजपच्या वरिष्ठ हि गोष्ट घातली तेव्हा भाजपच्या वरिष्ठांनी सांगितलं तुम्हाला पक्षात संधी नाही असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला आहे. आता मी मोकळा श्वास घेतलाय. मी भाजपत असताना माझ्यावर अनेक चौकश्या लावण्यात आल्या. माझी अगदी ईडी चौकशी करण्याचीही मागणी स्वपक्षीयांनी केली होती पण आता त्यांनी ईडी लावली तर मी त्यांच्यामागे सीडी लावेल लावेल असा इशारा एकनाथ खडसे यांनी भाजप आणि देवेंद्र फडणवीसांना दिला आहे.
२०१४ ला भाजप सरकार आल्यापासून माझी पक्षात गळचेपी होत असल्याची तक्रार खडसे यांनी नेहमी केली होती. त्यांच्या टीकेचा रोख हा नेहमी माजी मुख्यमंत्री तथा विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचयाकडे असायचा. पण आता या सर्व वादांना पूर्णविराम मिळण्याची शक्यता आहे.
बाईला समोर ठेऊन मी राजकारण करत नाही, असा टोला भाजप नेते एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताना देवेंद्र फडणवीसांवे लगावला आहे. खडसे असताना सामाजिक कार्यकरत्या अंजली दमानिया यांनी एकनाथ खडसे यांच्यावर मोठे गंभीर आरोप केले होते. आणि त्या आरोपांना फडणवीसांचे बळ आहे असा आरोप अनेकदा एकनाथ खडसेंनी केला होता.
सर्वांना प्रतीक्षा असताना आता भाजप नेते एकनाथ खडसे यांची अखेर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आहे. काही दिवसांपासून खडसे हे भाजप सोडणार याची मोठी चर्चा सुरु होती. पण आता ती प्रतीक्षा संपली आहे.
मुंबईत एका कार्यक्रमात शरद पवार यांच्या उपस्थितीत खडसेंनी पक्षप्रवेश केला आहे.मी ४० वर्ष भाजपमध्ये काम केल आहे. मला अशी अपेक्षा नव्हती कि भाजप मला अशा पद्धतीने वागणूक देईल, पण आता मोकळा श्वास सोडलंय आत प्रवेश करताना मी कुठलीही अट किंवा आमिष घेऊन राष्ट्रवादीत आलेलो नाही, मी प्रामाणिकपने राष्ट्रवादीच काम करणार आहे, असं पक्षप्रवेश केल्यानंतर एकनाथ खडसे यांनी म्हटलंय. तसेच यांनी प्रवेश करतानाच्या भाषणात भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली आहे.
Read Also ;
महाविकासआघाडी सरकार आणि भाजपने केंद्राकडून मदत आणण्यासाठी प्रयत्न करावेत: राजू शेट्टी https://t.co/ZkbFgYLfgW@rajushetti @Shetkari_S @BJP4Maharashtra @CMOMaharashtra
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 23, 2020