मुंबई : गेल्या काही दिवसापासून अमरावती लोकसभा मतदारसंघात अनेक राजकीय घडामोडी घडतांना दिसत आहेत. यातच केंद्रीय मंत्री अमित शाह यांची आज अमरावतीमध्ये जाहीर सभा होत आहे. त्याआधी मैदानावरून अपक्ष आमदार बच्चू कडू यांनी आक्रमक भूमिका घेतली होती. यातच आता अमित शाह यांच्या सभेच्या व्यासपीठावर अजित पवारांचा फोटो नसल्याने अमोल मिटकरी यांनी नवनीत राणांना इशारा दिलाय. तर त्यावरून राष्ट्रवादी शरद पवार गटातील पुणे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी मिटकरींना डिवचलं आहे.
अमित शाह यांची अमरावतीमध्ये जाहीर सभा होत आहे. मात्र सभेच्या ठिकाणी नवनीत राणा यांनी अजित पवार यांचा फोटो लावला नाही. त्यावरून नवनीत राणा आपण महायुतीचा धर्म विसरला आहात. महायुतीमध्ये मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करू नका अन्यथा निवडणुकीत याची मोठी किंमत मोजावी लागेल. असा इशारा अमोल मिटकरी यांनी नवनीत राणा यांना दिलाय.
हेही वाचा..“हनुमानजींनी काम दाखवलं, एक लाथ मारली अन् अमित शाहांचा सभामंडप खाली पडला”
अमोल मिटकरी यासंदर्भात एक व्हिडीओ देखील पोस्ट केलाय. त्यावर असं नाही नीट रडायचं. मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल असं म्हणत प्रशांत जगताप यांनी अमोल मिटकरी यांना चांगलचं डिवचलं आहे. त्यावरून आता अमरावतीमध्ये काय राजकीय घडामोडी घडणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
असं नाही.. नीट रडायचं !
मोठमोठ्याने टाचा रगडून रडायचं, तरच बोनस मिळेल. https://t.co/2jjkk3deBD— Prashant Sudamrao Jagtap (@JagtapSpeaks) April 24, 2024
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी…! शिखर बँक घोटाळा प्रकरणात सुनेत्रा पवारांना क्लीन चीट
हेही वाचा…‘लाव रे तो व्हिडिओ, दाखवत मल्हार पाटलांनी विरोधकांचा भांडाफोड केला, एकच चर्चा
हेही वाचा…“तानाशाही करणाऱ्यांच्या अहंकाराचे हनुमान जयंती दिवशीच दहन झाले”