IMPIMP
Ajit Pawar's related Jarandeshwar factory is being re-investigated Ajit Pawar's related Jarandeshwar factory is being re-investigated

मोठी बातमी…! अजित पवारांच्या संबंधित जरंडेश्वर कारखान्याची पुन्हा चौकशी सुरू

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या संबंधित असलेल्या जरंडेश्वर साखर कारखान्याची पुन्हा एकदा चौकशी सुरू करण्यात आली आहे. लाचलुचपत विभाग या कारखान्यातील गैरव्यवहार प्रकरणी चौकशी सुरू असून पुणे विभागात आता मोठ्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

हेही वाचा…गोलमाल है भाईस सब गोलमाल है..! भ्रष्टाचाराचा आरोप असलेल्या डॉ. पल्लवी सापळेच पुणे अपघात प्रकरणातील SIT च्या अध्यक्षा 

जरंडेश्वर कारखान्यातील गैरव्यवहार, कोरगाव येथील एक भुखंड आणि डिस्टलरी प्रकल्पासंदर्भात ही चौकशी सुरू करण्यात येत आहे. ईडीने जरंडेश्वर कारखान्याची चौकशी करून चार्जशीट दाखल केली होती. या कारखान्याची चौकशी सुरू झाल्याने पुन्हा खळबळ उडालीय.

हेही वाचा..“मी गप्प बसणार नाही, सगळ्यांची नावं उघड करेन”, अटक केलेल्या ससूनच्या डॉ. तावरेचा गर्भित इशारा

दरम्यान, ईडीने जरंडेश्वर सहकारी साखर कारखान्याची जागा, इमातर आणि इतर बांधकाम जप्त केलं होतं. महाराष्ट्र राज्य सहकारी बॅकेत २५ हजार कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आहे. या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी २२ ऑगस्ट २०१९ रोजी गुन्हा दाखल केला होता. याच आधारावर ईडीने गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. जरंडेश्वर कारखाना २०१० साली विक्री करण्यात आली होती. हा कारखाना मुळ किंमतीच्या कमी किंमतीत विकण्यात आला होता. याबाबत योग्य कार्यपद्धती पाळण्यात आली नाही, असा आरोप करण्यात आला आहे.

READ ALSO :

हेही वाचा..पोर्श कार अपघात प्रकरणी सुनील टिंगरेंचं नाव कसं समोर आलं? 

हेही वाचा..“बांगलादेशी घुसखोरांच्या मुसक्या आवळा”, पाच बांगलादेशींना अटक केल्यानंतर महेश लांडगे आक्रमक 

हेही वाचा..“सुप्रिया सुळेंमुळे अनेकजण पक्ष सोडताहेत”, शरद पवारांच्या लेडी जेम्स बॉंडचा गंभीर आरोप 

हेही वाचा…“छगन भुजबळांना आता आवरलं पाहिजे”, भुजबळांच्या ‘त्या’ वक्तव्यावरून भाजपात प्रचंड नाराजी 

हेही वाचा…“आम्ही महायुतीतले घटकपक्ष नाही, विधान परिषदनिवडणुक लढणार “, मनसेने महायुतीला दिला कडक इशारा