IMPIMP
ajit pawar vs vijay shivtare ajit pawar vs vijay shivtare

“अजितदादा माझे चांगले मित्र, सरकार यावं अन् मी मंत्री व्हावं,” विजय शिवतारेंचं विधान

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुरूवातीच्या टप्प्यात अजित पवारांच्या विरोधात आक्रमक भूमिका घेणारे माजी आमदार विजय शिवतारे आता पुर्णपणे मवाळ झाल्याचे दिसत आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी समजवल्यानंतर विजय शिवतारे यांनी लोकसभा निवडणुकीतून माघार घेतली. परंतु आता विजय शिवतारे यांनी आगामी विधानसभा निवडणुकीसाठी तयारी सुरू केल्याची माहिती समोर येत आहे. यातच आता बोलतांना त्यांनी अजित पवारांबद्दल मोठं विधान केलं आहे.

हेही वाचा..“मी एकनाथ शिंदेंची लाडकी बहिण “, विधान परिषदेची उमेदवारी मिळाल्याने भावना गवळींची प्रतिक्रिया

अजित पवारांबद्दल मी महायुतीत मिठाचा खडा पडेल असे काही वक्तव्य करणार नाही. साखर पडेल असेच मी बोलेल. अजित पवार माझे मित्र आहेत. हे सरकार परत यावे, मी आमदार व्हावे आणि मंत्री व्हावे अशी मागणी आपण पांडुरंगाकडे करू. असंही त्यांनी म्हटलं. शिवताऱ्यांच्या या वक्तव्यानंतर अजित पवारांच्या विरोधातील आक्रमक भूमिका मावळली अशी चर्चा आता सुरू झाली आहे.

हेही वाचा..मोदींना संसदेत बोलणंही मुश्किल, हेडफोन लावून भाषण, विरोधकांचा अभुतपूर्व गोंधळ

२०१९ च्या विधानसभा निवडणुकीत अजितदादांनी चॅलेंज देऊन शिवतारे यांचा पराभव केला. त्यावेळी त्याठिकाणी कॉंग्रेसचे संजय जगताप यांनी मोठा विजय मिळवला होता. तर दोन वेळा आमदार राहिलले आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे यांना पराभवाचा सामना करावा लागला होता. यातच आता महाविकास आघाडीत ही जागा कुणाच्या वाट्याला येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..“आधी धमकी नंतर दिलगिरी,” अंबादास दानवेंचं सभापतींना पत्र 

हेही वाचा..अमोल कोल्हेंना शरद पवार गटाकडून मोठं गिप्ट, पक्षाने दिली मोठी जबाबदारी 

हेही वाचा..”राज्यसभेवर खासदार होण्याचा शब्द दिलाय, विधानसभा लढवणार नाही”, जानकरांनी स्पष्टच सांगितले 

हेही वाचा..राष्ट्रवादीचा अजून एक शिलेदार अजित पवारांना धक्का देणार ? शरद पवार गटात जाणार का ?

हेही वाचा..इच्छूक उमेदवाराकडून पंढरपुर दर्शनाचा आटापिटा पडला महागात, खेड आळंदीत २१ जण गंभीर जखमी

Leave a Reply