नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. तपास यंत्रणेला याबाबतचा ई-मेल मिळाला आहे. या ई-मेलमध्ये केवळ तीनच शब्द’किल नरेंद्र मोदी’ (Kill Narendra Modi) असा उल्लेख आहे. या बाबत यंत्रणा अधिक तपास करत आहे.
टाईम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, हा ई-मेल [email protected] नावाच्या अकाऊंटवरुन [email protected] वर पाठवला आहे. हा ई-मेल मध्यरात्री 1 वाजून 34 मिनिटांनी पाठवला आहे.
याबाबत एनआयएने केंद्रीय गृहमंत्रालयाला पत्र लिहून सतर्क केले आहे. गृहमंत्रालयाने याबाबत पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या एसपीजीलाही माहिती दिली आहे. एनआयएने आपल्या पत्रासोबत ई-मेलची कॉपीही जोडली आहे. तसंच गृहमंत्रालयाने यावर योग्य कारवाई करण्यास सांगितलं आहे.