IMPIMP
Ambadas Danve Ambadas Danve

सभागृहात अंबादास दानवेंचा तोल सुटला, विधान परिषदेच्या सभागृहात मोठा गोंधळ

मुंबई : संसदेत राहुल गांधींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टिका केल्यानंतर त्याचे पडसाद आज राज्याच्या विधान परिषद सभागृहात देखील पडले. राहुल गांधींच्या वक्तव्यावरून भाजपचे आमदार सभागृहात चांगलेच आक्रमक झाले. त्यानंतर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि भाजपचे आमदार प्रसाद लाड यांच्यात तर जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.

हेही वाचा..“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार 

लोकसभेत विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज संसदेत केलेल्या भाषणाचा मुद्दा सत्ताधारी आमदारांनी विधान परिषदेत मांडला. या मुद्यावरून सभागृहात जोरात वाद सूरू झाला. यावेळी अंबादास दाने यांचा तोल सुटला आणि त्यांनी भाजपचे नेते प्रसाद लाड यांना शिवीगाळ केल्याचे पाहायला मिळाले. यातच सभागृहात मोठा गोंधळ बघायला मिळाला.

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

यानंतर माझा तोल सुटलेला नाही, मी शिवसैनिक आहे. माझ्यावर कोण बोट उचललं तर बोट तोडायची ताकद माझ्या मनगटात आहे. जो या सभागृहाचा विषय नव्हता. सभापतींना बोलायला हवं होतं. माझ्याकडे बोट दाखवून माझ्याकडे हातवारे करून बोलायचा अधिकार नाही. मग माझा आमदार विरोधी पक्षनेतानंतर सगळ्यात मी आधी शिवसैनिक आहे. हे आता मला हिंदुत्व शिकवणार का ? असा सवाल देखील त्यांनी केला.

दरम्यान, या संपुर्ण घटनेवर प्रसाद लाड यांनी देखील आपली प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, मी शिवी दिली नाही, ते माझ्या अंगावर आले. मी त्यांना सांगितलं तुम्ही असं बोललात तर आम्हीही तसंच बोलू. आम्ही त्यांच्यासोबत कुठेही बोलायला तयार आहे.

READ ALSO :

हेही वाचा..Good News : भारतातील पहिल्या ‘संविधान भवन’च्या उभारणीला चालना.! महेश लांडगेंच्या पाठपुराव्याला मोठे यश 

हेही वाचा…ठाकरे गटाचा उमेदवार विजयाच्या उंबारठ्यावर, अनिल परबांचा विजय निश्चित 

हेही वाचा…“गुजरातमध्ये आम्ही तुमचा पराभव केल्याशिवाय राहणार नाही”, थेट संसदेत राहुल गांधींनी मोदींना दिलं 

हेही वाचा..पंकजा मुंडेंचं भाजपकडून अखेर झालं राजकीय पुनर्वसन, विधान परिषदेवर मिळाली संधी 

हेही वाचा…“विधान परिषदेसाठी भाजपची यादी जाहीर..! ‘या’ पाच जणांना मिळाली भाजपकडून संधी 

Leave a Reply