IMPIMP
Sambhaji Bhide Sambhaji Bhide

“आंबेवाल्यानी आम्हाला संस्कृती शिकवू नये”, वादग्रस्त विधान केल्यानंतर भीडेंवर शब्दाचा भडीमार

पुणे : राज्यात सातत्याने वादाच्या भोवऱ्यात असणाऱ्या शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे यांनी पुन्हा एकदा खळबळजनक विधान केलं आहे. वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये. ड्रेस घातलेल्या महिलांनी जाऊ नये. साडी घातलेल्या महिलांनी जावं. असं विधान त्यांनी केलं आहे. त्यामुळे राज्यात नवा वाद होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यावरूनच आता महिला अध्यक्ष पुणे शहर कॉंग्रेस संगीता तिवारी यांनी मनोहर भिडे यांच्यावर कठोर शब्दात टिका केली आहे.

हेही वाचा..‘ती’ स्थिती विधानसभेत झाली तर राज्यात सत्ता बदलणारच ; शरद पवारांनी सांगितलं राजकीय गणित 

नेहमीच प्रसिद्धीच्या झोतात राहण्यासाठी वादग्रस्त विधाने करणारे आंबे वाले भिडे असं म्हणतात की वटसावित्रीच्या पुजेला नट्यांनी जाऊ नये. या बाबाला काय माहिती आहे ? महिला आपल्या पतीच्या आयुष्यासाठी नटून अंलकार घालून वडाची पुजा करतात. हा महिलांचा सण आहे. त्या सण साजरा करणाच आणि ती आमची हिंदू संस्कृती आहे. या आंबेवाल्यानी आम्हाला नाही शिकवायची संस्कृती. असा जोरदार प्रहार संगीता तिवारी यांनी केलीय.

हेही वाचा..पुणे विमानतळाचे नवे टर्मिनल लवकरच खुले होणार, केंद्रीय राज्यमंत्री मोहोळांनी सुरू केल्या मोठ्या हालचाली 

याला माणसाला ना बायको ना संसार, हा भटका माणूस आहे. उचलली जीभ लावली टाळ्याला. अतिशय बिनडोकपणाचे विधान हा आंबेवाला कायम करतो. हा आंबेवाला कायम महिलांचा, मुलींचा अपमान करत असतो. महिलांच्या बाबत नेहमी वादग्रस्त विधान करायचा किंवा बोलायचा अधिकार याला कोणी दिला आहे. असा सवाल देखील त्यांनी केलाय.

READ ALSO :

हेही वाचा…शिंदे गटात नगरमध्ये मोठी खांदेपालट, दिलीप सातपुतेंना पदावरून हटवलं 

हेही वाचा…“राज्यकर्त्यांकडून चर्चेची अपेक्षा करणं चुकीचं..” नव्या फौजदारी कायद्यावरून शरद पवारांचा टोला 

हेही वाचा..पेपरफुटीप्रकरणी कायदा होणार का ? रोहित पवारांचा सवाल, फडणवीसांनी दिलं ‘हे’ उत्तर 

हेही वाचा..विधान परिषदेच्या चार जागांचा निकाल आज लागणार ? कोण मारणार बाजी ? 

हेही वाचा..‘रेड झोन’ मधील ‘टीडीआर’ मुद्दा : अजित पवार गटाच्या माजी नगरसेवकाचा उतावीळपणा! 

Leave a Reply