मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी अभिनेत्री कंगना राणावतचा हरामखोर असा उल्लेख केला होता. यानंतर स्पष्टीकरण देत त्यांनी आपल्याला असे न म्हणता नॉटी म्हणजे खट्याळ किंवा बेईमान असे म्हणायचे होते, असे म्हटले. मात्र राऊत यांनी कंगनाचा नॉटी गर्ल असा उल्लेख केल्याने या वादात आणखीनच भर पडली आहे. आता माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी संजय राऊत यांचे नाव न घेता त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
He turns out to be more Naughty than what we thought ! #Naughty Naughty 😁
— AMRUTA FADNAVIS (@fadnavis_amruta) September 7, 2020
अमृता फडणवीस यांनी अप्रत्यक्षरित्या संजय राऊत यांनी टोला लगावत ट्विट केले की, आम्ही विचारही केला नव्हता त्याहीपेक्षा ते अधिक नॉटी निघाले. नॉटी नॉटी. या ट्विटमध्ये अमृता फडणवीस यांनी कोणाचेही नाव घेतले नसले तरी त्यांचा इशारा संजय राऊत यांच्याकडेच होता.
दरम्यान, याआधीही मृता फडणवीस यांनी शिवसेनेच्या जोडे मारो आंदोलनावरून टीका केली होती. आपल्याला एखाद्याचे म्हणणे पटू शकत नाही, पण लोकशाहीत व्यक्त होण्याचा आणि आपलं मत मांडण्याचा अधिकार सर्वांना आहे. वाद-प्रतिवाद होत रहावेत, पण पोस्टरला चपलांनी मारण हे पातळी घसरल्याचे लक्षण असल्याचं अमृता फडणवीसांनी म्हटले होते.