मुंबई – राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांचा आज ऐंशीवा वाढदिवस आहेस. त्यानिमित्ताने देशभरातुन त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव पडत आहे. मात्र नवल म्हणजे चक्क विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी यांनी देखील शुभेच्छा देत पवारांचे कौतुकच केले आहे. नेहमी महाविकासाआघाडीवर टीका करणाऱ्या अमृत फडणवीस यांना पवारांच्या एका गोष्टीची भुरळ पडली आहे.
“राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांच्याकडे ‘इम्पॉसिबल’ हा शब्दच नसतो. त्यांच्याकडे नेहमीच ‘आय एम पॉझिसिबल’ हा शब्द असतो. हेच त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे,” अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी दिली.
अमृता फडणवीस यांनी नुकतंच दिविज फाऊंडेशनमार्फत रक्तदान केले. यावेळी त्यांना एका वृत्तवाहिनीने शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्ताने प्रश्न विचारला होता. त्यावेळी त्यांनी ही प्रतिक्रिया दिली.
“शरद पवार हे महाराष्ट्राचे दिग्गज नेते आहेत. त्यांनी खूप महाराष्ट्रासह देशासाठी खूप काम केलं आहे. त्यामुळे त्यांना खूप खूप शुभेच्छा. शरद पवारांकडे इम्पॉसिबल हा शब्द नसतो. त्यांच्याकडे नेहमी शब्द असतो, आय एम पॉझिसिबल. हे त्यांच्याकडून घेण्यासारखं आहे. कितीही खाली गेलो तरी वर उसळून यायची हिंमत आणि इच्छा असायला पाहिजे. त्यासाठी वय, जात याचा काहीही संबंध नसतो,” अशी प्रतिक्रिया अमृता फडणवीस यांनी दिली.