पुणे : ‘नाव घेणार नाही, तिची लायकी नाही. पण मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी करते. मुंबई पोलिसांना माफिया म्हणते हे तिची लायकी नाही , अशा शब्दांत गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नाव न घेता कंगनावर निशाणा साधला आहे
पुण्यात राज्य पत्रकार संघातर्फे पोलीस आणि सामाजिक कार्यकर्ते यांचा कोरोना योद्धे म्हणून गौरव करण्यात आला. या कार्यक्रमाला गृहमंत्री प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. कार्यक्रमाला संबधित करताना गृहमंत्र्यांनी नाव न घेता कंगना आणि भाजपवर टीका केली.
नाव घेणार नाही, तिची लायकी नाही. पण मुंबईची तुलना पाक व्याप्त काश्मीरशी करते. मुंबई पोलिसांना माफिया म्हणते, तसेच तिला एका राजकीय पक्ष फायद्यासाठी पाठबळ देतो, हे अत्यंत खालच्या थराचे आहे, अशी टीका गृहमंत्र्यांनी भाजपवर केली आहे. गंभीर विषय असल्याचं सांगत नागरिकांनीही याची दखल घ्यावी, असं आवाहन गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केले आहे.
Read Also :