इंदापूर : शहरांपाठोपाठ ग्रामीण भागात ही कोरोणाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होत आहे. पुणे जिल्हा परिषद व इंदापूर पंचायत समितीमार्फत माजी मंत्री हर्षवर्धनजी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बावडा लाखेवाडी जिल्हा परिषद गटांमधील बावडा मधील बारावा फाटा येथून घरोघरी जाऊन सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याच्या मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषद सदस्या अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी केला.
सर्वेक्षण व नागरिकांची आरोग्य तपासणी करण्याची मोहीमेच्या सुरुवातीलाच अंकिता हर्षवर्धन पाटील यांनी देखील तपासणी करून घेतली व नागरिकांना विनंती केली की , आपल्या काही कोरोनाची लक्षण असल्यास तात्काळ आरोग्य यंत्रणेशी संपर्क साधावा व प्रशासनास सहकार्य कराव.
आज बावडा येथे ५० पथकांद्वारे आरोग्य कर्मचारी, शिक्षक, आरोग्य सेविका यांनी प्रत्येकाच्या घरोघरी जाऊन ऑक्सी मीटर, पल्स मीटर व थर्मामीटर च्या साह्याने नागरिकांची आरोग्य तपासणी करायला सुरुवात केली आहे. जे नागरिक तपासणी वेळी ज्या – ज्या नागरिकांना कोरोणाची लक्षण आढळून येतील त्या नागरिकांची स्वॅब टेस्टिंग करण्यात येणार आहे. जेणेकरून भविष्यात वाढणार धोका टळेल व कोरोणा नियंत्रणात येण्यास मदत होईल.
यावेळी बावडा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर कपिलकुमार वाघमारे, सरपंच किरणकाका पाटील, उपसरपंच निलेशजी घोगरे, आरोग्य कर्मचारी, शिक्षक व इतर यावेळी उपस्थित होते.
Read Also
भाजप सत्तेत आल्यानंतर बँक घोटाळ्यातील ३८ आरोपी देशाबाहेर गेलेhttps://t.co/RrkQiBAh8r@ianuragthakur #marathinews
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 15, 2020