IMPIMP
Answer from Muralidhar Mohol to Supriya Sule Answer from Muralidhar Mohol to Supriya Sule

“ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो”, मुरलीधर मोहोळांकडून सुप्रिया सुळेंना जशास तसं उत्तर

पुणे :  पुण्याचे भाजपचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनी रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात केंद्रीय राज्यमंत्री पदाची शपथ घेतली. यावर राष्ट्रवादी शरद पवार गटातील खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचं नाव न घेता टिका केली. हिंजवडीमधील ३५ ते ४० आयटी कंपन्या पुण्याच्या बाहेर जात आहेत. मंत्रिपद मिळाले आहे आता पुण्याला. त्याचा आम्हाला आनंद आहे. पण त्याचा उपयोग कॉंन्ट्रक्टरला न होता, पुणेकरांना व्हावा. असा टोला सुळेंनी लगावला.

हेही वाचा..मोठी बातमी…! “पंतप्रधान पदाचा कारभार स्विकारल्यानंतर मोदींचा पहिलाच शेतकऱ्यांसाठी निर्णय” 

सुप्रिया सुळे यांच्या टिकेला मुरलीधर मोहोळांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. मोहोळ म्हणाले की, खरं तर जवळपास ४० वर्षानंतर जनतेतून निवडून आलेल्या पुण्याच्या खासदाराला मंत्रीपदाची संधी मिळाली आहे. ही बाब समस्त पुणेकरांना गौरवान्वित करणारी आहे. पुण्याची राजकीय संस्कृती पाहिली तर यांचं निखळ मनानेच अपेक्षित होतं. असो पण या निमित्ताने आपल्या कोत्या मनोवृत्तीचं दर्शनही पुणेकरांना घडलं.

हेही वाचा…“‘त्या’ पुण्याईनं तुझ्यासाठी लोकसभेची दारं उघडली”, मोहोळांसाठी खास मित्राची पोस्ट 

ताई, आपली मळमळ, आम्ही समजू शकतो. माझ्यासारख्या सामान्य घरातील कार्यकर्त्याला थेट केंद्रीय मंत्रीपदावर संधी मिळणे, हे आपल्यासारख्या सोन्याचा चमचा घेऊन जन्मलेल्यांना लवकर पचणी पडणारे नाही. ृ त्यामुळे आपली टिपण्णी स्वाभाविक मानतो. उरला प्रश्न ठेकदारांचा, तर ठेकेदार कोणी पोसले? कोणी मोठे केले? पुण्यातील आणि महाराष्ट्राचे मोठे ठेकेदार कोणाचे पार्टनर आहेत? हे अवघ्या महाराष्ट्राला माहिती आहे. त्यामुळे असल्या तकलादू टिपण्णी करुन स्वतःचं हसं सोडून दुसरं काही होणार नाही. अशी टिकाही मोहोळांनी सुळेंवर केलीय.

READ ALSO :

हेही वाचा..“सुनेत्रा पवारांना राज्यसभेवर घेऊन केंद्रीय राज्यमंत्री करा”, अजित पवार गटाचा ठराव मंजूर 

हेही वाचा…“आता कशी वाजवली घंटी”? ‘ते’ विधान शिंदेंना भोवलं..! कोल्हापुरात कॉंग्रेसने शिंदेंना डिवचलं 

हेही वाचा..Ground Report : पिंपरी-चिंचवडच्या ‘एकनाथ’चा मुंबईतील ‘मातोश्री’वर दबदबा ! दिग्गज नेते ‘मशाल’हातात घेण्याच्या तयारीत 

हेही वाचा…“शिवसेनेच्या बाबतीत भाजपने केंद्रात दुजाभाव केला,” श्रीरंग बारणेंकडून खदखद व्यक्त 

हेही वाचा..विनोद तावडेंवर भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुरा ? विनोद तावडेंचं दिल्लीत वाढलं वजन