नवी “फोटोमधील अनेकजण शेतकरी वाटत नाहीत. जे शेतकऱ्यांच्या हिताचं आहे तेच सरकारने केलं आहे. शेतकऱ्यांना कृषी कायद्याची काहीच अडचण नाही. ज्यांना आहे ते शेतकरी नसून इतर लोकं आहेत. या आंदोलनामागे विरोधी पक्षांबरोबरच कमिशन मिळणाऱ्या लोकांचाही हात आहे” असं . काँग्रेस नेते व्ही. के. सिंह यांनी म्हटलं आहे.
‘दिल्ली चलो’ आंदोलनासाठी दिल्लीच्या दिशेने निघालेले हजारो शेतकरी अजूनही सिंधू सीमेवर ठाण मांडून बसले आहेत. सरकारने आंदोलक शेतकऱ्यांना बुराडी मैदानात आंदोलन करण्याचा प्रस्ताव दिला होता. मात्र शेतकऱ्यांनी सरकारच्या प्रस्तावाला केराची टोपली दाखवत दिल्लीच्या सीमेवरच आंदोलन सुरू ठेवणार असल्याची भूमिका शेतकरी संघटनांनी घेतली आहे. जोवर सरकार कृषी कायदे मागे घेत नाही तोवर आंदोलन सुरूच राहणार असल्याचा निर्धार शेतकऱ्यांनी केला आहे.
केंद्र सरकारच्या कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहेत. केंद्र सरकारने कृषी कायदा मागे घ्यावा. अशी मागणी शेतकरी करीत आहेत. यासाठी गेल्या काही दिवसांपासून दिल्ली सीमेवर शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. दरम्यान, मंगळवारी सरकार व शेतकरी नेत्यांची बैठक झाली. काँग्रेसचे नेते आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा एक व्हिडीओ शेअर करत मोदी सरकारवर हल्लाबोल केला आहे.