ठाणे : युवक काँग्रेसच्या ठाणे शहर जिल्हा अध्यक्षपदी आशिष गिरी यांची निवड करण्यात आली आहे. गिरी यांनी आजवर पक्षासाठी दिलेले योगदान आणि केलेली आंदोलने यामुळे राज्याचे युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी आशिष गिरी यांच्यावर ठाणे शहराच्या युवक काँग्रेसच्या पदाची जबाबदारी सोपवली आहे.
तळागाळाच्या कार्यकर्त्यांची जाणीव ठेवणारे सत्यजित तांबे यांनी आजपर्यंत मी पक्षासाठी केलेल्या कामाची पोच पावती मला या जबाबदारीच्या रूपाने दिली असल्याचे मत आशिष गिरी यांनी यावेळी व्यक्त केले. तसेच काँग्रेस नेहमीच युवकांचे प्रश्न मांडण्यात अग्रेसिव्ह आहे आणि पुढे देखील युवकांना न्याय देण्यासाठी प्रयत्न करेल असे देखील गिरी यावेळी म्हणाले. तसेच पक्षाकडून सोपवण्यात आलेल्या जबाबदारीबद्दल आशिष गिरी यांनी सत्यजित तांबे यांचे आभार देखील मानले.
हे देखील वाचा
BREAKING NEWS
युवा नेते रोहित पाटील यांची कोरोना टेस्ट पॉझिटिव्हhttps://t.co/Qbs5x1yrNM@rohitrrpatilncp @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) September 3, 2020