नागपुर : लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात दुसऱ्या टप्प्यातील मतदारसंघात येत्या ०७ मे रोजी मतदान होत आहे. त्यामुळे आता राज्यातील जवळपास अकरा लोकसभा मतदारसंघातील राजकीय नेत्यांच्या प्रचाराच्या तोफा थंडवणार आहे. यातच विदर्भातील १० च्या १० जागा आम्हीच जिंकणार असून केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा देखील पराभव होईल. अशी शक्यता कॉंग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी व्यक्त केली आहे.
हेही वाचा…“सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध,”, चंद्रकांत पाटील अन् मोहोळांचा सीएंशी संवाद
विजय वडेट्टीवार म्हणाले की, आम्ही विदर्भातील १० च्या १० जागा जिंकणार असा विश्वास सर्व महाविकास आघाडीच्या नेत्यांना आहे. मराठवाड्यातील सुद्धा दहा पैकी आठ जागा जिंकणार आहोत. यातच नांदेडसह छत्रपती संभाजीनगरपासून लातूर पर्यंत सगळीकडे मोदींंच्या विरोधात लाट निर्माण झाली आहे. असा दावा देखील वडेट्टीवार यांनी व्यक्त केलाय.
हेही वाचा…मोठी बातमी…! मतदानापुर्वीच अजित पवारांनी शरद पवाराचं मैदान मारलं
दरम्यान, यातच देशात नरेंद्र मोदी हे हिंदू मुस्लिम मताचे विभाजन करीत आहेत. रामाच्या नावाने लक्ष केंद्रीत करण्याचा प्रयत्न केला जात आहे. महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती लक्षात घेतली तर याठिकाणी भाजपसह महायुतीचा सुपडा साफ झाल्याशिवाय राहणार नाही. अशा इशारा देखील वडेट्टीवार यांनी महायुतीला दिला आहे.
READ ALSO :
हेही वाचा..“हा ‘ट्रेलर आहे अजून पिक्चर अभी बाकी है’”,सुनील तटकरेंनी विरोधकांना दिला इशारा
हेही वाचा..“थेट मुंबईहून आंतरवाली सराटी गाठत जय पवारांची जरांगे पाटलांशी भेट “राजकीय वर्तुळात चर्चा
हेही वाचा…नितीन गडकरींनी सुनील तटकरेंना पाठवल्या खास शुभेच्छा, म्हणाले..
हेही वाचा..बारणेंसाठी पुत्र विश्वजीत बारणेंचा प्रचारात धडाका, तरूणांचाही मोठा प्रतिसाद
हेही वाचा..“मोदींच्या सभेमुळे धाराशिवचं राजकीय वातावरण बदललं”, धनंजय मुंडेंचं मोठं विधान