रायगड : लोकसभा निवडणूक 2024 मधील तिसऱ्या टप्प्यातील मतदानाच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे. यातील रायगड लोकसभा मतदारसंघात महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे निवडणूक लढवत आहे. येत्या ७ मे रोजी येथे मतदान होणार आहे. त्यांच्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी जनतेला सुनील तटकरे यांना मतदान करण्याचे आवाहन केले आहे.
नितीन गडकरी यांनी आपल्या एका व्हिडिओच्या माध्यमातून तटकरे यांना शुभेच्छा संदेश पाठवला आहे. यामध्ये म्हणाले आहेत की, “रायगड लोकसभा मतदार संघातील निवडणुकीसाठी महायुतीचे उमेदवार आणि माझे मित्र सुनील तटकरे यांना शुभेच्छा. केवळ लोकसभा क्षेत्रातच नाही तर कोकणातील रायगड विभागामध्ये तटकरे यांनी अतिशय यशस्वी नेतृत्व केलेले आहे. कोकणातील रस्त्यांसाठी त्यांनी पुढाकार घेऊन काम केले. अनेक रस्त्यांच्या कामाला सुरूवात झालेली आहे. मुंबई – गोवा महामार्ग करताना अनेकदा अडचणी आल्या. त्यावेळी त्यांची मदत मोलाची ठरली.
आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली नवीन राष्ट्र निर्मितीची प्रक्रिया गतिशील झाली आहे. आत्मनिर्भर भारत, सुखी -संपन्न भारत बनवायच असेल तर अतिशय स्थिर आणि विकासा करिता काम करणार सरकार ही देशाची गरज आहे. यासाठी सुनील तटकरे यांना खासदार म्हणून निवडणून द्यावे, असे मी जनतेला आवाहन करतो. असेही गडकरींनी म्हटलंय.
दरम्यान, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सुनील तटकरे यांना जनतेला मतदान करण्याचे आवाहन केल्याबद्दल तटकरे यांनी त्यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.
READ ALSO :
हेही वाचा..बारणेंसाठी पुत्र विश्वजीत बारणेंचा प्रचारात धडाका, तरूणांचाही मोठा प्रतिसाद
हेही वाचा..“मोदींच्या सभेमुळे धाराशिवचं राजकीय वातावरण बदललं”, धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध,”, चंद्रकांत पाटील अन् मोहोळांचा सीएंशी संवाद
हेही वाचा…मोठी बातमी…! मतदानापुर्वीच अजित पवारांनी शरद पवाराचं मैदान मारलं
हेही वाचा…“पार्टटाईम राजकारण, केवळ काम करण्याचा अभिनय”,आढळराव पाटलांची कोल्हेंवर खोचक टिका