पुणे : लोकसभा निवडणुकीसाठी मतदानाला काही अवघे दिवस शिल्लक राहिले आहेत. अशातच आता उमेदवारांनी देखील आपल्या प्रचारात वेग घेतला आहे. अशातच मावळ मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार श्रीरंग बारणे यांच्या प्रचारासाठी त्यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी देखील महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू केला आहे. त्यांना तरूणांचा मोठा प्रतिसाद देखील मिळत असल्याचे दिसत आहे.
मावळ मतदारसंघातील घाटावरील भागात तसेच घाटाखालीली भागातही पनवेल, उरण, कर्जतमध्ये, श्रीरंग बारणे यांचे पुत्र विश्वजीत बारणे यांनी महायुतीच्या प्रचाराचा धडाका सुरू केलाय. प्रचारफेरी, कोपरा सभा, बैठका घेऊन आख्खा मतदारसंघ पिंजून काढत आहेत. विश्वजीत बारणे तरूण असल्याने तरूणांचा त्यांना मोठा प्रतिसाद बघायला मिळत आहे. तरूणांमध्ये त्यांची मोठी क्रेझ दिसून येत आहे. घाटाखालील तसेच घाटावरील भागात वडिलांच्या प्रचाराची धुरा विश्वजीत यांनी घेतलीय.
श्रीरंग बारणे यांच्यासाठी काढण्यात आलेल्या प्रचारफेरीत तरूणांचा मोठा सहभाग दिसून आला. तरूणांमध्ये विश्वजीत बारणे यांची क्रेझ दिसून आली. त्यांच्यासोबत सेल्फी घेण्यासाठई तरूणाईने गर्दी केली होती. तर शिवसेना-भाजप महायुतीचा विजय असो, कोण आला रे कोण आला, शिवसेनेचा वाघ आला, येऊन येऊन येणार कोण, अप्पाशिवाय आहेच कोण अशा घोषणा देखील यावेळी देण्यात आल्या.
READ ALSO :
हेही वाचा..“मोदींच्या सभेमुळे धाराशिवचं राजकीय वातावरण बदललं”, धनंजय मुंडेंचं मोठं विधान
हेही वाचा…“सीएंचे प्रश्न सोडविण्यासाठी नेहमीच कटिबद्ध,”, चंद्रकांत पाटील अन् मोहोळांचा सीएंशी संवाद
हेही वाचा…मोठी बातमी…! मतदानापुर्वीच अजित पवारांनी शरद पवाराचं मैदान मारलं
हेही वाचा…“पार्टटाईम राजकारण, केवळ काम करण्याचा अभिनय”,आढळराव पाटलांची कोल्हेंवर खोचक टिका