पुणे : कल्याणीनगर भागात झालेल्या अपघाताबाबत आज विशाल अग्रवाल याला सत्र न्यायालयात हजर करण्यात आले. त्याची आज पोलीस कोठडी संपल्याने कोठडी आणखी वाढ करण्याची मागणी पोलिसांनी केली. त्यावर सत्र न्यायालयाने देखील विशाल अग्रवाल याच्या पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. यातच या प्रकरणात कलम ४२० देखील लावण्यात आलं आहे. गुन्हे शाखेकडून आणखी ७ दिवसांच्या पोलीस कोठडीची मागणी करण्यात आली होती. ती देखील मान्य करण्यात आली आहे.
हेही वाचा…गावाच्या पारावर राजकारणासाठी गेला जीव, कोण जिंकणार ? वाद झाला अन्…
सत्र न्यायालयात आरोपी विशाल अग्रवाल याला हजर केले असता अग्रवालच्या घराबाहेर रजिस्टर ताब्यात घेतलं आहे. यासह घरातील सीसीटीव्हीचा डीव्हीआर, आरोपीचा मोबाईल, ताब्यात घेतला असून तो सायबर तज्ज्ञांकडून तपास केला जात आहे. यातच वेदांतनं कोझी हॉटेलमध्ये ४७ हजारांचं बिल भरलं होतं. त्या अकाऊंट्सची देखील माहिती घेणं आवश्यक असल्याचं पोलिसांनी न्यायालयात म्हटलं आहे.
तर अपघातातील गाडी ब्रह्या लेजर्स कंपनीच्या नावानं खरेदी केलेली आहे. यातच घराचं सीसीटिव्ही फुटेज ताब्यात घेतलं असून मात्र छेडछाड केल्याचा त्यात संशय व्यक्त करण्यात येत आहे. अल्पवयीन आरोपीसोबत त्याच्या मित्रांनी दारूसह अन्य कशाचं सेवनं केलं होतं का ? याचा देखील तपास केला जात आहे.
यातच आज विशाल अग्रवालच्या वकिलांनी न्यायालयात आज मोठा युक्तिवाद केला. यातच ही अपघाताची केस आहे. मात्र यामध्ये मीडिया ट्रायल सुरू आहे. १ हजार ७५८ रूपये फी भरली नाही म्हणून शासनाची फसवणूक केल्याचं म्हणत अगरवालांवर कलम ४२० लावण्यात आलं आहे. तर आरोपीने पॉकेटमनीतून पबमध्ये पैसे भरले की बॅकं खात्यातून याचा देखील तपास करावा. पैसे कुठून भरले याचा तपास करायला पोलिसांना वेळ का लागतो ? असा सवालही करण्यात आला.
READ ALSO :
हेही वाचा..राज्यात पाण्याची भीषण टंचाई, शरद पवारांनी राज्य सरकारकडे केल्या ‘या’ मागण्या
हेही वाचा…लोकसभेनंतर विधानपरिषदेच्या ४ जागांसाठी निवडणुकांची घोषणा, नवीन वेळापत्रक जाहीर
हेही वाचा…“गृहमंत्री महोदय, गाडीखाली कुत्रं नाही तर जीवंत माणसं चिरडली जातायेत”
हेही वाचा…“पोलिस कर्मचाऱ्याचा पबमधला फोटो ट्विट करत धंगेकरांचा पोलिसांवर निशाणा,” कारवाई करा अन्यथा…